‘डॉन-3’ मधून किंग खानची एक्झिट

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या लोकप्रिय सिनेमांपैकी एक ‘डॉन’ या सिनेमाच्या तिसऱ्या सिक्वेलची शूटिंग लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठीचं शेड्युलही तयार झाल्याची माहिती होती. मात्र, आता या सिनेमाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘डॉन-3’ मध्ये शाहरुख खानच्या जागी अभिनेता रणवीर सिंगला घेण्यात आलं आहे. म्हणजे आता ‘डॉन’ सिनेमाच्या तिसऱ्या भागात […]

‘डॉन-3’ मधून किंग खानची एक्झिट
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या लोकप्रिय सिनेमांपैकी एक ‘डॉन’ या सिनेमाच्या तिसऱ्या सिक्वेलची शूटिंग लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठीचं शेड्युलही तयार झाल्याची माहिती होती. मात्र, आता या सिनेमाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘डॉन-3’ मध्ये शाहरुख खानच्या जागी अभिनेता रणवीर सिंगला घेण्यात आलं आहे. म्हणजे आता ‘डॉन’ सिनेमाच्या तिसऱ्या भागात रणवीर सिंग दिसणार आहे. या बातमीमुळे शाहरुख खानच्या जगभरातील चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला असेल. कारण, ‘डॉन’ हा सिनेमा शाहरुखच्या लोकप्रिय सिनेमांपैकी एक आहे.

शाहरुखने खाजगी कामासाठी या सिनेमातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे आता निर्मात्यांची गोची झाली आहे. वेळेवर कुणाला सिनेमात घ्यायचं, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सूत्रांनुसार, आता या सिनेमासाठी रणवीर सिंगला कास्ट करण्यात येणार आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकारिकरित्या सांगण्यात आलेलं नाही. तर या सिनेमात रणवीरसोबत कतरिना कैफ दिसू शकते.

जर शाहरुखने खरंच हा सिनेमा सोडला असेल, तर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो. ‘डॉन-3’ ला सोडण्यापूर्वी शाहरुखने ‘सारे जहां से अच्छा’ हा सिनेमाही अर्ध्यावर सोडला होता.