Sonali Bendre : कॅन्सरमुळे केस खूप गळाले, विग्समुळे त्रास…सोनाली बेंद्रेनं सांगितला कठीण काळ

Sonali Bendre On Cancer : सोनाली बेंद्रेला काही वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालेलं. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत या कठीण काळाबद्दल सांगितलं आहे.

Sonali Bendre : कॅन्सरमुळे केस खूप गळाले, विग्समुळे त्रास...सोनाली बेंद्रेनं सांगितला कठीण काळ
| Updated on: Oct 07, 2026 | 3:56 PM

मराठी अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्रीनं तिच्या सौंदर्यानं चाहत्यांना भुरळ घातली. मात्र. 2018 मध्ये तिच्या आयुष्यात एक कठीण प्रसंग ओढवला. सोनाली बेंद्रेला ‘हाय-ग्रेड मेटास्टॅटिक कॅन्सर’चं निदान झालेलं. अशातच आता ‘अमुक तमुक‘ला दिलेल्या मुलाखतीत सोनालीनं याबद्दल भाष्य केलं आहे. सोनाली म्हणाली की, ‘जेव्हा मला कॅन्सरचं निदान झालं, तेव्हा माझ्या नवऱ्यानं माझ्या मुलाला आईला हे असं असं झालंय हे सांगितलं. तेव्हा माझ्या मुलाची पहिली प्रतिक्रिया होती की, ‘बाबा, ही आपल्या कुटुंबासाठी खूप कठीण परिस्थिती असणार आहे आणि याचा आपल्या पूर्ण कुटुंबावर परिणाम होणार आहे.’

 

Loading...

काय होती अभिनेत्रीच्या मुलाची प्रतिक्रिया?

‘माझ्या मुलाची प्रतिक्रिया ऐकून आम्हाला आश्चर्य वाटलं आणि त्याला हे सगळे कुठून माहीत झालंय, असं वाटले. तेव्हा मुलानं सांगितले, ‘मी आईबरोबर एक पुस्तक वाचलं होतं, त्यामध्ये एका भावाला असंच निदान झाल्यानंतर, त्यांचं सगळं जग बदलतं, याबद्दल सांगितलं होतं. त्यामुळे आता पप्पा आणि माझं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. कारण, हा आजार तसाच आहे.’

‘त्याचं हे बोलणं ऐकून गोल्डीला वाटलं, एवढ्या लहान मुलाला हे सगळं कसं माहीत आहे? पण मुलानं ते पुस्तक वाचल्यामुळे त्याला याबद्दल माहीत होतं. त्या पुस्तकात त्याच्या वयाचा एक मुलगा आहे आणि त्याच्या धाकट्या भावाला कर्करोग होतो आणि त्याचं पूर्ण जग कसं बदलतं, हे त्यानं वाचलं होतं. ते वाचल्यामुळे एवढा अवघड आणि गंभीर विषय त्याच्या लक्षात आला होता. आम्ही त्याच्याशी कधी यावर बोललो नव्हतो, पण पुस्तकामुळे त्याला गांभीर्य लक्षात आलं.’

‘गोष्टीची पुस्तकं म्हणून महत्त्वाची असतात. पुस्तक किंवा गोष्टी ही अशा प्रकारे उपयोगी पडतात. पुस्तकापेक्षा त्यातील गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.’ असंही सोनाली शेवटी म्हणाली.

तसेच ‘मित्र म्हणे‘ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनाली म्हणाली की, ‘त्यावेळी केस खूप गळाले होते. काही चॉईस नव्हता. मी केसांचे विग्स बनवले होते. पण त्या विग्समुळे खूप त्रास झाला, खूप घाम यायचा. तेव्हा मला खरंच जाणवलं की, सौंदर्य काही सेकंदात जाऊ शकतं. मग त्याच्यापुढे काय? असं नाही की, सौंदर्य गेलं म्हणजे आयुष्य संपलं. तुम्हाला हे स्वीकारणं गरजेचं आहे. मला तेव्हा कळालं की, आपल्या हक्काची लोकं किती आहेत, आणि आपल्यावर किती प्रेम करतात. प्रत्येक दिवस तुमच्यासाठी बोनस आहे, ही गोष्ट तेव्हा जाणवली’

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us