Sourav Joshi : इतक्या खालच्या पातळीला…पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून बायकोला प्यायला दिलं पाणी, युट्युबरवर संतापले नेटकरी

Sourav Joshi : सौरभ जोशी वादात सापडला असून सौरभचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो आपली पत्नी अवंतिकाला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पिण्यास सांगताना दिसत आहेत.

Sourav Joshi : इतक्या खालच्या पातळीला...पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून बायकोला प्यायला दिलं पाणी, युट्युबरवर संतापले नेटकरी
| Updated on: Oct 15, 2026 | 7:36 PM

प्रसिद्ध यूट्यूबर सौरभ जोशी त्याच्या नवीन व्लॉगमुळे सोशल मीडियावर वादात सापडला आहे. या व्लॉगमध्ये त्यानं त्याची पत्नी अवंतिका भट्टला, त्याचा पाळीव कुत्रा ओरिओच्या भांड्यातून पाणी पिण्याचं चॅलेंज दिलं. जेव्हा अवंतिकानं नकार दिला, तेव्हा सौरभनं पाणी स्वच्छ असल्याचा दावा करत तिला एक घोट प्यायला सांगितलं. अखेरीस अवंतिकाने हे चॅलेंज पूर्ण केलं. या कृतीमुळे प्रेक्षक आणि सोशल मीडिया युजर्सकडून संताप व्यक्त केला जातोय. काहींनी व्ह्यूजसाठी केलेलं हे अत्यंत वाईट कृत्य असल्याचं म्हटलं आहे.

ट्रुथ ऑर डेअर गेममध्ये मिळालेलं चॅलेंज

Loading...

सौरभ जोशी त्याच्या कुटुंबासोबत ‘ट्रुथ ऑर डेअर’ हा खेळ खेळत होता. सौरभनं गंमतीने अवंतिकासमोर ही अट ठेवली. अवंतिकानं सुरुवातीला स्पष्टपणे नकार दिला, पण सौरभने आग्रह धरला की, संपूर्ण भांडे नाही, तर किमान एक घोट तरी पाणी पी. सौरभनं स्वतः कुत्र्याचं भांडं उचलून अवंतिकाकडे आणलं आणि पाणी नुकतंच बदललं असून ते पूर्णपणे स्वच्छ असल्याचं तिला सांगितलं. थोडे आढेवेढे घेत, अवंतिका ते पाणी प्यायली.

व्हिडिओ पाहून चाहते संतापले

सौरभने व्लॉगमधील इतरांनाही विचारलं की, त्यानं काही चुकीचं म्हटलं आहे का? सौरभसाठी हा एक विनोद किंवा खेळाचा भाग असू शकतो, पण यावर संताप व्यक्त केला जातोय. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. व्ह्यूजसाठी कोणी इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतं का, असा प्रश्न लोक विचारत आहेत.

 

एका युझरने लिहिलं, ‘हे स्क्रिप्टेड असलं तरी, प्रेक्षक तरुण आहेत. अशा प्रकारच्या वाईट गोष्टींना सामान्य मानलं जाऊ नये.’ दुसऱ्यानं लिहिलं, ‘हे अजिबात विनोदी नाही. एक सुशिक्षित स्त्री अशा गोष्टी करण्यास तयार आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे.’ आणखी एकानं लिहिलं, ‘सौरभ अशा वाईट गोष्टी पोस्ट करत आहे, त्याला वाटलं असेल हे विनोदी आहे, पण लोक त्याच्यावर संताप व्यक्त करत आहेत.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us