Swara Bhasker : सिनेमाच्या क्रूमध्ये मी एकटी स्त्री होते, दिग्दर्शक दारूच्या नशेत रात्री आला अन्…स्वरा भास्करनं सांगितला धक्कादायक प्रसंग

Swara Bhasker : स्वरा भास्करनं 'राईज अँड फॉल सीझन 2' मध्ये तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे.

Swara Bhasker : सिनेमाच्या क्रूमध्ये मी एकटी स्त्री होते, दिग्दर्शक दारूच्या नशेत रात्री आला अन्...स्वरा भास्करनं सांगितला धक्कादायक प्रसंग
| Updated on: Oct 01, 2026 | 7:01 PM

२०१८ सालच्या ‘पद्मावत’ चित्रपटातील जौहर सीनला भ्याडपणाचं म्हटल्याबद्दल स्वरा भास्करला नुकत्याच एका कार्यक्रमात मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं. मात्र, स्वराने अशी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची ही पहिली वेळ नाही. सध्या स्वरा ‘राईज अँड फॉल सीझन २’ चं शूटिंग करत असून तिथेही ती चर्चेत आहे. एक प्रोमो क्लिप समोर आली आहे, ज्यामध्ये स्वरा तिच्या एका चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकाच्या गैरवर्तनाबद्दलचा एक किस्सा सांगत आहे.

स्वरा भास्करनं सांगितला प्रसंग

Loading...

‘राईज अँड फॉल सीझन २’ च्या या व्हिडिओमध्ये स्वरा सांगते की, करिअरच्या सुरुवातीला एका शूटिंगदरम्यान एका गेस्ट हाऊसमध्ये ती सिनेमाच्या क्रूमधील एकमेव महिला सदस्य होती. अभिनेत्रीनं सांगितलं की, ही घटना ‘तनु वेड्स मनु’ या चित्रपटानंतर घडली होती.

स्वरा म्हणाली, ‘माझा एक चित्रपट होता, आणि त्याचा दिग्दर्शक माझ्या मागे लागला होता. त्यानं माझं डोकं चक्रावून टाकलं होतं. हे ‘तनु वेड्स मनु’नंतर लगेचच घडलं होतं. तो माझा मुख्य भूमिकेतील मोठा चित्रपट होता, ज्याचं चित्रीकरण ५६ दिवसांचं होतं आणि मी त्यात नायिका होते. सुरुवातीला, त्यानं मला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, एका अभिनेत्रीनं दिग्दर्शकावर प्रेम केलं पाहिजे, तिनं असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे. मी म्हणाले, ‘ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे.’

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मग मी काय करू? तो मेसेज पाठवत होता, ‘तू अशी आहेस, तू तशी आहेस…आता तू माझ्यासमोर बसलेली आहेस.’ मग त्याने काय केलं, तर त्यात एक लव्ह सीन होता. म्हणजे, सिनेमात एक गाणं होतं, आणि तो ते करून दाखवत होता. तो म्हणाला, ‘आपण या सीनची तालीम करूया.’ मी विचारलं, ‘त्या तालमीत कोण कोण आहे?’ तो म्हणाला, ‘आपण दोघे यावर चर्चा करू.’ मी म्हणाले, ‘नाही, तुम्ही कलाकारांना बोलवा, कॅमेरामनला बोलवा. जर तालीम असेल, तर सगळेजण तिथे असतील. मी हे एकटी का करू?’

स्वरा म्हणाली, ‘आम्ही ज्या गेस्ट हाऊसमध्ये राहत होतो, तिथे मी एकटीच स्त्री होते. मी आत गेले, आणि दिग्दर्शक व सिनेमॅटोग्राफर… बाटली अर्धी रिकामी होती, ते दोघे बसून दारू पीत होते. तुम्ही कल्पना करू शकता की एका तरुण स्त्रीला, किंबहुना विशीच्या सुरुवातीच्या वयातील मुलीला, दोन दारुड्या पुरुषांमध्ये का बोलावलं असेल? मी इतकी घाबरले होते की कशीबशी तिथून निसटण्यात यशस्वी झाले.’

स्वरा पुढे म्हणाली, ‘तो दारूच्या नशेत रात्री आला आणि माझ्या दारावर टकटक करू लागला. मला वाटलं, ‘आता हा दार तोडणार आहे का?’ जेव्हा मी दार उघडलं, तेव्हा तो पूर्णपणे हादरलेला होता. मी विचारलं, ‘काय झालं?’ तो म्हणाला, ‘मी तुला मिठी मारू का?’ मी म्हणाले, ‘नाही, तुम्ही मला मिठी मारू शकत नाही.’ त्यावर तो म्हणाला, ‘मिठी मारण्यात काय वाईट आहे? आपण फक्त मिठी मारतो.’ मी म्हणाले, ‘नाही, तुम्ही असं नाही करू शकत. सर, कृपया दूर जा. मला भीती वाटते.’ स्वरा भास्करनं सांगितलेला प्रसंग ऐकून शोमध्ये तेज प्रताप यादव म्हणाले, ‘तू त्याला का नाही मारलंस?’ स्वरा म्हणाली, ‘मी कसं मारू शकले असते? ते चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, सर.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us