Tanishaa Mukerji : ब्रेनवॉश केलं, मानसोपचारतज्ज्ञांकडे…सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितली बिग बॉसची काळी बाजू

Tanishaa Mukerji : अभिनेत्री तनिषा मुखर्जीनं नुकत्याच एका मुलाखतीत बिग बॉस या वादग्रस्त शोची काळी बाजू सांगितली आहे.

Tanishaa Mukerji : ब्रेनवॉश केलं, मानसोपचारतज्ज्ञांकडे...सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितली बिग बॉसची काळी बाजू
| Updated on: Oct 20, 2026 | 3:24 PM

बिग बॉसच्या घरात अनेकदा प्रेमसंबंध निर्माण होतात. काही जोडप्यांची लग्न होतात तर काहींचा ब्रेकअप होतो. काजोलची बहीण तनिषा मुखर्जीसुद्धा बिग बॉसच्या सातव्या पर्वात सहभागी झालेली. बिग बॉसच्या घरात असताना तिची अरमान कोहलीसोबत जवळीक वाढली. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत तनिषानं अरमान कोहलीसोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. बिग बॉसचा हा मनाचा खेळ असून या नात्यात अडकण्यासाठी तिचं ब्रेनवॉश केलेलं, असा दावा तनिषानं केला.

काय म्हणाली तनिषा मुखर्जी?

Loading...

तनिषा मुखर्जी म्हणाली की, ‘या गोष्टींसाठी तुमचं ब्रेनवॉश केलं जातं. दोघांना मुद्दाम कठीण परिस्थितीत एकत्र ठेवलं जातं. कधी त्यांना तुरुंगात एकत्र ठेवलं जातं. त्यामुळे दोघंही एकाच त्रासातून जात असल्यान त्यांना एकमेकांबद्दल सहानुभूती वाटू लागते. अशा अनुभवांमुळे तुमच्या मनात काही खोट्या भावना निर्माण होतात, ज्या खरंतर तुमच्या स्वतःच्या नसतात. एकत्र आलेल्या अनुभवांमुळे या भावना तयार होतात, पण हे अनुभव निवडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला नसतं. रिअॅलिटी शोसाठी काम करणारे लोकच अशा परिस्थिती निर्माण करतात. या गोष्टी मला नंतर समजल्या.’

‘त्यानंतर अशा परिस्थिती निर्माण केल्या गेल्या की, आम्ही दोघंही एकाच प्रकारच्या भावनिक त्रासातून जात होतो आणि त्यामुळे आमच्यात ट्रॉमा बॉन्डिंग निर्माण झालं. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर मला मानसोपचारतज्ज्ञांकडे गेले. या शोमुळे झालेल्या ब्रेनवॉशिंगमधून बाहेर पडायला मला सहा महिने लागले. अशा रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होताना खूप सावध राहायला हवं.’

‘आजची तरुण मुलं मात्र अशा गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतात. मी ज्या वातावरणात वाढले, त्यामुळे एका वेगळ्याच जगात राहत होते. इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ न करता स्वतःचं आयुष्य जगण्यावर माझा विश्वास होता. बिग बॉसच्या घरात येईपर्यंत मला अशा प्रकारच्या हेराफेरीचा अनुभवच आला नव्हता.’ असंही तनिषा शेवटी म्हणाली. ‘अनफोल्डिंग ह्युमन्स‘ला दिलेल्या मुलाखतीत तनिषा मुखर्जी बोलत होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us