Tanushree Dutta : छळ केला जातो, वेश्याव्यसायात…बॉलिवूडबद्दल तनुश्री दत्तानं केलेला धक्कादायक दावा

Tanushree Dutta On Bollywood : अभिनेत्री तनुश्री दत्तानं एका जुन्या मुलाखतीत बॉलिवूडबद्दल धक्कादायक दावा केला आहे.

Tanushree Dutta : छळ केला जातो, वेश्याव्यसायात...बॉलिवूडबद्दल तनुश्री दत्तानं केलेला धक्कादायक दावा
| Updated on: Oct 25, 2026 | 5:01 PM

अभिनेत्री तनुश्री दत्ता तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अभिनेत्रीनं एका जुन्या मुलाखतीत सिने–इंडस्ट्रीबद्दल भाष्य केलेलं. तनुश्रीनं दावा केलेला की, अनेक नवोदितांना स्तुती आणि गोड आश्वासनांच्या माध्यमातून इंडस्ट्रीत आणलं जातं आणि नंतर त्यांना विचित्र किंवा शोषणाच्या परिस्थितीत ढकललं जातं.

तनुश्री दत्ता काय म्हणाली?

Loading...

‘मेरी सहेली’ला दिलेल्या एका मुलाखतीत तनुश्री म्हणाली की, ‘तू हॅन्डसम आहेस, तू सुंदर आहेस, असं म्हणून फसवणूक केली जाते. तू नायिका होशील, असं सांगितलं जातं. कौतुक हे एक सापळा बनू शकतं.’ अभिनेत्रीने आरोप केला की, नवोदित कलाकार अशाच खोट्या कौतुकाच्या जाळ्यात सापडतात.

‘पालक मुलांना अनोळखी लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला देतात, पण मोठे झाल्यावर ते स्वतः ते पाळत नाहीत. पालक आपल्याला लहानपणापासूनच शिकवतात की, अनोळखी लोकांसोबत जाऊ नका. जर कोणी तुम्हाला चॉकलेट दाखवलं, तर तुम्ही त्यांच्यासोबत जाल का? इथे चॉकलेट म्हणजे फक्त चॉकलेट नाही. इथे ते एका वेगळ्या प्रकारचं चॉकलेट आहे. लोक तुमच्या महत्त्वाकांक्षा, आशा आणि आकांक्षांचा गैरफायदा घेतात. ते त्यांच्याशी खेळतात.’ असं तनुश्री म्हणाली.

तनुश्री म्हणाली की, प्रसिद्धी आणि यशाची स्वप्नं घेऊन इंडस्ट्रीत येणाऱ्या तरुण कलाकारांना सावध करणं, हे अशा विषयांवर जाहीरपणे बोलण्यामागील मुख्य कारणांपैकी एक आहे. ती म्हणाली, ‘मी आज हे सर्व बोलत आहे, कारण जर माझ्याकडे हे व्यासपीठ असेल आणि मी चार जीव जरी वाचवू शकले, तरी ते माझ्यासाठी पुरेसं आहे.’

तिने पुढे असा दावा केला की, अनेक नवोदित कलाकार करिअर घडवण्याच्या आशेनं इंडस्ट्रीत येतात, पण अखेरीस त्यांना शोषण आणि भावनिक त्रासाला सामोरे जावे लागते. तनुश्री म्हणाली, ‘इथे अनेक मुलं आणि मुली येतात. त्यांचा वापर केला जातो, त्यांचा छळ केला जातो आणि मग त्यांना अक्षरशः फेकून दिलं जातं, आणि काहींना तर वेश्याव्यवसायात ढकललं जातं. काही लोक वेश्याव्यवसायात अडकतात कारण त्यांचा इतका छळ झालेला असतो की, लोक त्यांना त्यात ढकलतात. काही जण इतके खचलेले असतात की, ते आपल्या गावी परत जातात.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us