जानकी आणि आजोबांचं खास नातं; मिलिंद गवळींकडून ‘आई कुठे काय करते’च्या सेटवरचे अनुभव शेअर

| Updated on: Mar 12, 2024 | 8:44 PM

Actor Milind Gawali Shared Video About Aai Kuth Kaay Karte Serial : आई काय करते या मालिकेच्या सेटवरील व्हीडिओ अभिनेते मिलिंद गवळी यांनी शेअर केलाय. यात छोट्या जानकीसोबतचे खास क्षण शेअर केलेत. आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवरीर अनुभव त्यांनी शेअर केलेत. वाचा...

जानकी आणि आजोबांचं खास नातं; मिलिंद गवळींकडून आई कुठे काय करतेच्या सेटवरचे अनुभव शेअर
Follow us on

मुंबई | 12 मार्च 2024 : आई कुठे काय करते…! स्टार प्रवाहमधील या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. मालिकेत अरूंधतीचा पती आशुतोष केळकरचं निधन झाल्याचं दाखवलं आहे. तसंच या मालिकेची वेळही देखील बदलण्यात आली आहे. आता ही मालिका दुपारी अडीच वाजता बघायला मिळणार आहे. याचनिमित्त या मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी यांनी खास व्हीडिओ शेअर केला आहे. चिमुकली जानकीसोबतचा व्हीडिओ शेअर करत मिलिंद गवळी यांनी या मालिकेच्या सेटवरील अनुभव शेअर केला आहे.

मिलिंद गवळी यांची पोस्ट जशीच्या तशी

आमची स्टार प्रवाह वरची मालिका “आई कुठे काय करते” ही आता दुपारी २.३० वाजता बघायला मिळणार आहे ! जेव्हापासून ही मालिका सुरू झाली तेव्हापासून लोकांचे प्रचंड प्रेम आम्हा मिळालेलं आहे, आणि अजूनही मिळत आहे . या अशा प्रचंड यशाची कारणं खूप आहेत,
प्रथम म्हणजे आमची ही डायरेक्टर्स कट प्रोडक्शन कंपनी अतिशय यशस्वी प्रोड्युसर आमचे राजेंची शाही सर @rajan.shahi.543 , यांचं या सिरीयल मधलं involvement स्वतः दिग्दर्शक, अतिशय पेशनेट passionate, असल्यामुळे त्यांना यशाची गुरुकिल्ली मिळालेली आहे, त्यानंतर स्टार प्रवाह @star_pravah हे चॅनल त्यांची क्रिएटिव्ह टीम , भन्नाट आहेत, नमिता ही प्रोजेक्टची हेड आहे, तिने लिहिलेली गोष्ट आणि स्क्रीन प्ले जे प्रेक्षकांना मालिका बघण्यासाठी सतत त्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण करत असते.

जी दिग्दर्शनाची टीम रवी कर्मकर, सुबोध आणि तुषार , चार वर्षे सातत्याने लिहून येतं त्याला justice देण्याचा मनापासून प्रयत्न करत असतात, कलाकारांविषयी काही बोलायलाच नको ते एकापेक्षा एक talented आणि मेहनती आहेतच, आणि बाकीचे डिपार्टमेंट पण काय कमी नाही आहेत , मेकअप डिपार्टमेंट आर्ट डिपार्टमेंट प्रोडक्शन एडिटिंग कपडे पट शेड्युलर यांचे जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे , पालेकरांचं पण कौतुक करायला हवं कारण आज चार वर्षे त्यांनी त्यांचा बंगला आम्हाला शूटिंगला दिलेला आहे! आमचे स्पोर्ट बॉय असे खूप लोक आहेत त्यांच्या मेहनती शिवाय असं यश मिळू शकत नाही । पण मला या यशाच्या मागे आणखीन एक कारण जाणवतं, जे तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओमध्ये कदाचित जाणवेल, अतिशय कौटुंबिक वातावरणात खेळीमेळीने चेष्टा मस्करी करत प्रोफेशनल पद्धतीने शूटिंग चाललेलं असतं.

या सिरीयलमध्ये 87 वर्षाचे जयंत सावरकर पण होते आणि अगदी एक वर्षाची ही जानकी पण आहे , त्यांची सुधा तेवढ्यात आत्मविशेने काळजी घेतली जायची आणि या जानकीची पण प्रत्येक जण खूप प्रेमाने काळजीपूर्वक , तिच्या कलाने तिच्या पद्धतीने ते शूटिंग केलं जातं ,
आपल्या घरी जेव्हा एखादा लहान बाळ येत तेव्हा आपल्या घरातलं सगळं वातावरण जसं बदलून जात, बाळ झोपलं असेल तर कसे सगळे शांतपणे आवाज न करता काम करत असतात, आणि जर ते उठलं असेल आणि खेळत असेल तर मग सगळेच घरातले त्याच्याबरोबर खेळायला उत्सुक असतात.

सेटवर जानकी आली की होतं, तिच्या मूड प्रमाणे सगळ्या वातावरण होतं, मला हा फारच सुंदर अनुभव मिळतो ,खरंच ना यश म्हणजे नेमकं काय असतं ? यश म्हणजे एकमेकांचं एकमेकांवर असलेलं अफाट प्रेम एकमेकांची काळजी,माया एकमेकांविषयीचं कौतुक, जे इथे खूप अनुभवायला मिळतं !