Tiger Shroff : टायगरला सलमाननेच केलं लाँच, एकत्र सिनेमाही केला, म्हणूनच…लॉरेन्स बिश्नोई गँगच्या टार्गेटवर अभिनेता का आला?

मुंबईच्या जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. बिश्नोईने या गोळीबाराची संपूर्ण जबाबदारी उचलली, सलमान खान सोबत काम करणाऱ्यांवर असाच हल्ला चढवला जाणार अशी धमकीही पोस्ट करून दिली आहे.

Tiger Shroff : टायगरला सलमाननेच केलं लाँच, एकत्र सिनेमाही केला, म्हणूनच...लॉरेन्स बिश्नोई गँगच्या टार्गेटवर अभिनेता का आला?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 18, 2026 | 9:40 PM

मुंबईच्या जुहू परिसरात आज अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर 5 वेळा अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या 3 लोकांनी टायगर श्रॉफच्या दिशेने झाडण्यात आल्या. यात सुदैवाने टायगर श्रॉफ वाचला असून त्याला कुठेही गोळी लागलेली नाही. पण यात त्याचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

लॉरेन्स बिश्नोई गँगने संपूर्ण गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. गुंड अनिल पंडित बिन्शोई यांनी पोस्ट करत या घटनेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे.बिन्शोई गँगच्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे जो पण सलमान खान सोबत काम करेल त्याची खैर नाही. त्याला सोडणार नाही. याआधी बिश्नोई गँगने सलमान खान यांच्या घरावर गोळीबार केलाय, तर बाबा सिद्धीकी यांची हत्या केली. याशिवाय कपिल शर्मा याच्या स्टुडिओवर गोळीबार केला, तर रोहित शेट्टी याच्याही घरावर गोळीबार केला होता आणि सर्वांची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वत: हून स्वीकारली होती. तर आता त्यांच्या टार्गेटवर टायगर श्रॉफ असल्याचं चित्र स्पष्ट झालं. जुहूच्या पुष्पा पार्क परिसरात तीन अज्ञात हल्लेखोरांनी भर रस्त्यात गोळीबार केला.

Loading...

 

सलमान खान सोबत काम करणाऱ्या कलाकांरांना सोडणार नाही

सलमान खानसोबत काम न करण्यासाठी टायगरला समजावलं होतं. नोटीसा पाठवल्या होत्या पण तो काही ऐकला नाही. म्हणून आज त्याला या पद्धतीने समझावण्याचा प्रयत्न केला. मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये जो सलमान खानसोबत काम करणार त्याचा पुढचा नंबर असणार, त्याला पुढल्या वेळी टार्गेट केलं जाणार असं बिश्नोईने आपल्या गोळीबाराच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

 

 

 

 

 

सलमान खान आणि टायगर श्रॉफ यांनी कोणत्या सिनेमात एकत्र काम केलंय?

टायगर श्रॉफला बॉलिवूडमध्ये सलमान खान याने एन्ट्री मिळवून दिली. त्यामुळे टायगर आणि सलमान यांचे संबंध घरच्यांप्रमाणे आहेत. सिंघम अगेन (२०२४ ) या चित्रपटात टायगर श्रॉफने ‘एसीपी सत्या’ ही भूमिका साकारली होती. तर सलमान खानने त्याचा दबंग चित्रपटातील प्रसिद्ध चुलबुल पांडे या पात्रात कॅमिओ केला होता. हे दोन्ही अभिनेते यशराज फिल्मच्या स्पाय यु्निव्हर्सचा भाग आहेत. परंतु त्यांचे सिनेमे वेगवेगळे होते. आतापर्यंत सलमान आणि टायगरने एकत्र कोणतीही स्क्रिन शेअर केलेली नाही. आगामी काळात टायगरचे भरपूर सिनेमे येणार आहेत. यामध्ये जान्हवी कपूर आणि विद्युत जामवालसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us