Tiger Shroff Firing : आता जो कोणी कुत्रा…टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करताच बिश्नोई गँगच्या टार्गेटवर नवं नाव, बॉलिवूडची झोप उडाली!

Tiger Shroff Firing : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याप्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गॅंगनं घेतली होती.

Tiger Shroff Firing : आता जो कोणी कुत्रा...टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करताच बिश्नोई गँगच्या टार्गेटवर नवं नाव, बॉलिवूडची झोप उडाली!
| Updated on: Oct 18, 2026 | 8:33 PM

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईतील जुहू येथे गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. अभिनेत्याच्या ड्रायव्हरला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. टायगरवरील प्राणघातक हल्ल्याच्या बातमीनं इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. ही घटना मुंबईतील जुहू येथील पुष्पा पार्कमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तीन अज्ञात मोटारसायकलस्वार आले आणि त्यांनी अभिनेत्याच्या गाडीवर गोळीबार केला. हा गोळीबार लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून करण्यात आल्याचं समोर येत आहे. त्यासंबंधी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट

Loading...

व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, जय महाकाल….जय श्री राम…आज टायगर श्रॉफने केलेल्या या कामाची जबाबदारी घेणाऱ्या सर्व भावांना राम राम. अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी या गोळीबाराची जबाबदारी घेतली. आम्ही त्याला बोलावून समजावून सांगितलं, पण त्याला समजलं नाही. म्हणून आज आम्ही त्याला आमच्या पद्धतीनं समजावून सांगितलं. मुंबई चित्रपटसृष्टीत जो कोणी आमचं ऐकणार नाही किंवा सलमान खानसोबत काम करेल, त्याचा नंबर पुढचा असेल.’

‘टीप: आणि आता जो कोणी कुत्रा आमच्या नावावर प्रसिद्धी मिळवण्याचा विचार करतोय त्यांच्या दुसऱ्या गटालाही लवकरच मारलं जाईल.’ असंही शेवटी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

 

गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे?

मुंबईतील गोळीबारातून टायगर श्रॉफ सुरक्षित आहे. तो कोणत्याही प्रकारे जखमी झालेला नाही. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये टायगरची कार घरातून बाहेर पडताच चाहत्यांची गर्दी जमते, त्यानंतर गोळीबार होतो आणि मग चेंगराचेंगरी होते. या गोळीबारात लोक जखमी झाल्याचे आवाजही ऐकू येत आहेत.

इतकंच नाही तर, समोर आलेल्या व्हिडिओनुसार, मुंबईतील जुहू येथे झालेल्या या गोळीबारात अंदाजे पाच गोळ्या झाडण्यात आल्या. अधिकृत माहितीनुसार, हा आकडा यापेक्षा जास्त असू शकतो. दरम्यान, टायगर श्रॉफलाही गेल्या वर्षी जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us