Tiger Shroff : हल्ला झाल्यानंतर टायगर श्रॉफने घेतला मोठा निर्णय, थेट मुंबईतील आलिशान घरच विकले
कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफच्या नव्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टी डीलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. टायगरने मुंबईतील आपलं आलिशान अपार्टमेंट विकलं आहे. गोळीबाराच्या काही दिवसांनंतर टायगरच्या घराच्या विक्रिची बातमी समोर आल्याने या व्यवहाराकडे लक्ष वेधलं गेलं आहे

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारजवळ मुंबईत गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर आता टायगरच्या एका मोठ्या प्रॉप्रर्टी डीलची चर्चा सुरू झाली आहे. टायगरने मुंबईतील खार पश्चिम परिसरातील आपलं आलिशान अपार्टमेंट तब्बल 9 कोटी रूपयांना विकलं आहे.
रिअल इस्टेट डेटा विश्लेषण करणाऱ्या सीआरई मॅक्ट्रिक्सच्या माहितीनुसार, या व्यवहाराची नोंदणी 22 ऑक्टोबर 2026 रोजी झाली. टायगरचं हे अपार्टमेंट खार पश्चिम येथील रूस्तमजी पॅरामाऊंट डी को – ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या 9 मजल्यावर आहे. तसेच या घराच क्षेत्रफळ 1,291.14 चौरस फूट आहे.
टायगरने 2018 मध्ये हे अपार्टमेंट बिल्डरकडून 7.61 कोटी रूपयांना खरेदी केलं होतं. आता त्याची विक्री 9 कोटी रूपयांना झाली आहे. म्हणजेच खरेदीच्या किमतीच्या तुलनेत विक्रिची किंमत सुमारे 1.39 कोटी रूपयांनी जास्त आहे.
याआधीही टायगरने प्रॉपर्टी विकली होती. 2025 मध्ये त्याने याच इमारतीतील दुसरं अपार्टमेंट 15.6 कोटी रूपयांना विकलं होतं. तर 2026 च्या सुरूवातीला पुण्यातील हडपसर परिसरातील मालमत्तेची 8.87 कोटी रूपयांना विक्री केली होती.
दरम्यान 18 ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरातील टायगरच्या कारजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली होती. तो फुटबॉल खेळून परतत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत टायगर सुरक्षित राहिला, तर त्याचा चालक आणि एक व्यक्ती जखमी झाले. गोळीबाराच्या काही दिवसांनंतर टायगरच्या घराच्या विक्रिची बातमी समोर आल्याने या व्यवहाराकडे लक्ष वेधलं गेलं आहे. मात्र घर विकण्याचा निर्णय आणि गोळीबाराची घटना यांचा परस्पर संबंध नाही.