‘गुड न्यूज’! तैमूर आणि अक्षय कुमार एकत्र दिसणार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

मुंबई : बॉलिवूडचा स्टार किड म्हणजेच अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान हा नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याची फॅन फॉलोईंग ही कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. त्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यामुळे तैमूर सिनेमांमध्ये कधी काम करणार याबाबत नेहमीच करिना कपूरला विचारलं जातं. याबाबत […]

‘गुड न्यूज’! तैमूर आणि अक्षय कुमार एकत्र दिसणार
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचा स्टार किड म्हणजेच अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान हा नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याची फॅन फॉलोईंग ही कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. त्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यामुळे तैमूर सिनेमांमध्ये कधी काम करणार याबाबत नेहमीच करिना कपूरला विचारलं जातं. याबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. तैमूर हा आई करिनासोबत ‘गुड न्यूज’ या सिनेमामध्ये दिसणार आहे. या सिनेमात करिना कपूर आणि अभिनेता अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, तैमूर हा ‘गुड न्यूज’ या सिनेमामध्ये दिसणार आहे. त्याने दोन सिन्सचं शूटिंगही केलं आहे. या सीनमध्ये त्याच्यासोबत करिना कपूर आणि अक्षय कुमार दिसणार आहेत. तैमूर तब्बल 10 मिनिटं या सिनेमात दिसणार आहेत. यासंबंधिचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, हा व्हिडीओ याच सीनमधील टिम शॉटमधून घेण्यात आला आहे. यापूर्वीही तैमूरचा अभिनेत्री कियारा आडवाणीसोबत खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

‘गुड न्यूज’ या सिनेमामध्ये तैमूर काम करतोय की, नाही याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. पण, जर तैमूर खरंच या सिनेमात दिसणार असेल तर ही त्याच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. धर्मा प्रोडक्शन ‘गुड न्यूज’ हा सिनेमा बनवत आहे. हा सिनेमा 6 सप्टेंबर 2019 ला प्रदर्शित होणार आहे.