Tukaram Mundhe : शाहरुख, अजय आणि टायगरच्या पान मसाला जाहिरात प्रकरणी मोठी अपडेट, तुकाराम मुंढे म्हणाले, योग्य वेळ…

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांच्या पान मसाला जाहिरात प्रकरणी मोठी अपडेट दिली आहे.

Tukaram Mundhe : शाहरुख, अजय आणि टायगरच्या पान मसाला जाहिरात प्रकरणी मोठी अपडेट, तुकाराम मुंढे म्हणाले, योग्य वेळ...
| Updated on: Oct 15, 2026 | 6:40 PM

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विमल इलायचीच्या जाहिरातीप्रकरणी अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्यावर केलेल्या कारवाईसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निवेदन जारी केलं होतं. त्यांनी सांगितलेलं की, या अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अशातच आता यासंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे.

काय म्हणाले तुकाराम मुंढे?

Loading...

तुकाराम मुंढे यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, पान मसाला प्रकरणात शाहरुख खान, टायगर श्रॉफ आणि अजय देवगण यांचं उत्तरं आलं आहे. मात्र यावर योग्य वेळ आली की बोलणार, असंही तुकाराम मुंढे म्हणाले.

एफडीएच्या बृहन्मुंबई विभागानं ११ ऑगस्ट रोजी या तिन्ही अभिनेत्यांना नोटीस बजावली होती. विमल इलायचीच्या जाहिरातीचा वापर ‘विमल पान मसाला’ या प्रतिबंधित उत्पादनाच्या अप्रत्यक्ष प्रचारासाठी केला जात असल्याचा आरोप होता. पान मसाला हे महाराष्ट्रात प्रतिबंधित उत्पादन आहे. या अभिनेत्यांना नोटीसला प्रतिसाद देण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. यापूर्वी तुकाराम मुंडे यांनी सांगितलेलं की, तिन्हीपैकी दोघांनी एफडीएच्या नोटीसला प्रतिसाद दिला आहे, तर एकाला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, कोणत्या अभिनेत्यानं प्रतिसाद दिला नाही, हे त्यांनी उघड केलं नव्हतं.

एफडीए आयुक्तांनी अन्न सुरक्षा आणि मानके विनियम, २०१८ चा संदर्भ देत जाहिरातदारांच्या जबाबदारीबाबतचा युक्तिवाद फेटाळून लावला. त्यांनी सांगितलेलं की, कायद्यात अन्न उत्पादनांच्या जाहिरातींसाठी स्पष्ट तरतूद आहे आणि त्यांची जाहिरात करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेसाठी काही जबाबदाऱ्या देखील निश्चित केल्या आहेत. यावर बोलताना म्हणालेले की, कोणत्याही उत्पादनाचं समर्थन करणाऱ्या व्यक्तीनं योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. त्यांनी पुढे असंही सांगितलेलं की, ही केवळ नैतिक जबाबदारीची बाब नाही, तर जाहिरातदार कायदेशीररित्या देखील जबाबदार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र एफडीएच्या मते, शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्या इलायचीच्या जाहिरातीत एका पान मसाला ब्रँडचा अप्रत्यक्षपणे प्रचार होत असल्याचा संशय आहे. या आधारावर, स्पष्टीकरण मागण्यासाठी तिन्ही कलाकारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us