Ujjwal Nikam : अलका याग्निक आणि अनुराधा पौडवाल यांच्यातील स्पर्धेमुळे गुलशन कुमार यांची हत्या? उज्ज्वल निकम यांनी सांगितलं सत्य

Ujjwal Nikam On Gulshan Kumar : उज्ज्वल निकम यांनी एका मुलाखतीत गुलशन कुमार यांच्या हत्येबद्दल भाष्य केलेलं. काय म्हणालेले उज्ज्वल निकम? जाणून घ्या.

Ujjwal Nikam : अलका याग्निक आणि अनुराधा पौडवाल यांच्यातील स्पर्धेमुळे गुलशन कुमार यांची हत्या? उज्ज्वल निकम यांनी सांगितलं सत्य
| Updated on: Oct 19, 2026 | 6:41 PM

१२ ऑगस्ट १९९७ रोजी, मुंबईतील अंधेरी येथील जितेश्वर महादेव मंदिराबाहेर गुलशन कुमार यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अबू सालेमनं गायक गुलशन कुमार यांच्याकडे दरमहा ५ लाख रुपयांची मागणी केली होती. गुलशन कुमार यांनी नकार दिला. यामुळे संतापलेल्या सालेमनं आपला मारेकरी राजा याच्याकडून दिवसाढवळ्या गुलशन कुमार यांची हत्या केली. गुलशन कुमार यांच्यावर १६ गोळ्या झाडण्यात आल्या. गुलशन कुमार मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्याचवेळी, मंदिराबाहेर तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर एकापाठोपाठ एक १६ गोळ्या झाडल्या. जेव्हा त्यांच्या ड्रायव्हरनं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हल्लेखोरांनी त्याच्यावरही गोळ्या झाडल्या. गुलशन कुमार यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या हत्येच्या कटात संगीतकार नदीमचा सहभाग असल्याचा आरोप होता. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर नदीम इंग्लंडला फरार झाला. एका जुन्या मुलाखतीत उज्ज्वल निकम म्हणालेले की, नदीम सैफी गुलशन कुमार यांच्या हत्येचा मास्टरमाईंड आहे. अशातच आता एका मुलाखतीत उज्ज्वल निकम यांनी गुलशन कुमार प्रकरणी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले उज्ज्वल निकम?

Loading...

उज्ज्वल निकम म्हणाले की, ‘गुलशन कुमारची हत्या त्यांच्या आपापसातील वादावरून करण्यात आलेली. मला त्याबद्दल सांगणं योग्य वाटत नाही. आपापसातील वाद, प्रोफेशनल वाद यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. त्यांची हत्या करणाऱ्या एका शुटरला अटकही करण्यात आली. पण, त्या मागचे मास्टर माइंड समोर आले नाहीत. त्यांचा हेतू वेगळा होता. अलका याग्निक आणि अनुराधा पौडवाल यांच्यातील वादसुद्धा गुलशन कुमार यांच्या हत्येचं कारण आहे. आम्हाला तपासादरम्यान याबद्दल समजलं आणि आता याबद्दल बोलून काही फायदा नाही. कारण, त्याबद्दल पुरावा नाही.’

‘नदीम सैफी भारतात यायला तयार होता, पण तो नाही आला. अजूनही त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आपल्या डायिंग डिक्लेरेशन कायद्यानुसार, मृत व्यक्ती शेवटी जे काही बोलली असेल ते खरं मानलं जातं. पण, फॉरेन कोर्टमध्ये त्यांच्या कायद्यानुसार आपले पुरावे तपासले जातात. गुलशन कुमारच्या केसमध्येही असंच होतं. पण, फॉरेन कोर्टमध्ये त्याला मान्यता दिली नाही.’ असं उज्ज्वल निकम यांनी शेवटी सांगितलं. ‘द लल्लनटॉप‘ला दिलेल्या मुलाखतीत उज्ज्वल निकम बोलत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us