Upcoming Marathi Movies : एकाच दिवशी मराठी सिनेमांची थिएटरमध्ये मोठी गर्दी! 6 सिनेमे एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

Upcoming Marathi Movies : मराठी चित्रपटसृष्टीत २३ ऑक्टोबर २०२६ रोजी तब्बल ६ नवीन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाचे अनेक पर्याय मिळाले आहेत. जे वेगवेगळ्या विषयांवर आधारित आहेत. कौटुंबिक नातेसंबंध, थरारपट, सामाजिक व राजकीय प्रश्न आणि तरुणाईचे आयुष्य अशा वैविध्यपूर्ण कथा या चित्रपटांच्या माध्यमातून पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.

| Updated on: Oct 24, 2026 | 5:20 PM
1 / 7
मराठी चित्रपटसृष्टीत 23 ऑक्टोबर 2026 हा दिवस नव्या चित्रपटांच्या रिलीजमुळे चर्चेत आला आहे. या दिवशी 1-2 नव्हे तर तब्बल 6 मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. प्रेमकथा, विनोदी चित्रपट, गुन्हेगारीवर आधारित थरारपट आणि तरूणाईच्या आयु्ष्यावर भाष्य करणाऱ्या कथा अशा वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट एकाच दिवशी चित्रपटगृहात दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसमोर या आठवड्यात मराठी मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत 23 ऑक्टोबर 2026 हा दिवस नव्या चित्रपटांच्या रिलीजमुळे चर्चेत आला आहे. या दिवशी 1-2 नव्हे तर तब्बल 6 मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. प्रेमकथा, विनोदी चित्रपट, गुन्हेगारीवर आधारित थरारपट आणि तरूणाईच्या आयु्ष्यावर भाष्य करणाऱ्या कथा अशा वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट एकाच दिवशी चित्रपटगृहात दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसमोर या आठवड्यात मराठी मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

2 / 7

या रिलीजमध्ये 'लग्न आणि बरंच काही', 'कापूसकोंडा' , 'दशमी' आणि 'मॅगझीन या चित्रपटांचा समावेश आहे. एकाच दिवशी अनेक चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. या सहा चित्रपटांमध्ये 'मृत्यूचक्र' आणि 'सरपंच- द पॉवर मॅन' यांचाही समावेश आहे. मात्र मॅगझीन हा चित्रपट तरूणाईच्या आयुष्यावर आधारित असला तरी तो केवळ जेन - झी पूरता मर्यादित नाही. या चित्रपटांत तरूण पिढीचे विचार, नाती आणि जुन्या - नव्या पिढीतील अंतर दाखवण्यात आलं आहे.

3 / 7

कोणत्या चित्रपटांत काय पाहायला मिळणार ? : 'लग्न आणि बरंच काही' या चित्रपटात पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर मुख्य भूमिकेत आहेत. वेदांती दानी दिग्दर्शित हा चित्रपट लग्नानंतरच्या आयुष्यातील नाती, अपेक्षा आणि जबाबदाऱ्यांवर भाष्य करतो.

4 / 7

सचिन पिळगांवकर यांची मुख्य भूमिका असलेला 'कापूसकोंडा' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची कथा निवृत्त सरकारी अधिकारी आणि त्याच्या श्वानाभोवती फिरते.

5 / 7

'दशमी' मध्ये मकरंद अनासपुरे आणि रवी प्रकाश यांच्या भूमिका आहेत. अन्यायाविरोधात न्याय मिळवण्यासाठी एका तरूणीने आणि तिच्या कुटुंबाने केलेला संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

6 / 7

'मॅगझीन'मध्ये तरूण पिढीच्या आयुष्याची गोष्ट पाहायला मिळते. तर 'मृत्यूचक्र' हा शशांक शेंडे, अक्षया गुरव आणि आस्ताद काळे यांच्या भूमिका असलेला सस्पेन्स आणि क्राइम थ्रिलर आहे. 'सरपंच - द पॉवर मॅन'हा सामाजिक आणि राजकीय विषयांवर आधारित चित्रपट आहे.

7 / 7

एकाच दिवशी 6 वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट प्रदर्शित झाल्याने मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरतो. आता या चित्रपटांपैकी प्रेक्षक कोणत्या कथेला सर्वाधिक पसंती देतात आणि बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us