Urfi Javed : उर्फी जावेद एका कार्यक्रमादरम्यान जखमी, अभिनेत्रीच्या पायाला दुखापत; चाहते चिंतेत
Urfi Javed Injured : उर्फी जावेदच्या पायाला एका कार्यक्रमादरम्यान दुखापत झाली असून त्याचे फोटो अभिनेत्रींनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आपल्या विचित्र फॅशनमुळे उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. अनेकदा उर्फीला ट्रोलही केलं जातं. मात्र, त्यावर ती सडेतोड उत्तर देते. उर्फी तिच्याविषयीचे अपडेट्स सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करते. आता उर्फी तिच्या एक पोस्टमुळे चर्चेत आली आहे. उर्फीला एका कार्यक्रमादरम्यान दुखापत झाली असून त्याचे फोटो अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. उर्फीच्या पायाला दुखापत झालेली दिसत आहे, त्यामुळे तिचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
उर्फी जावेदला दुखापत
एका इंडियन गेम शोमध्ये टास्क करत असताना उर्फी जावेद जखमी झाली. उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पायाला दुखापत झालेल्याचा फोटो शेअर केला, ज्यामुळे तिच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. उर्फीचा पाय काळा, निळा झालेला दिसत आहेत. मात्र, उर्फीने अद्याप तिच्या दुखापतीबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. चाहते उर्फी लवकरात लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
उर्फी जावेदची पोस्ट
उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पायाचा फोटो शेअर करत लिहिलं की, ‘चांगलंच लागलंय’, पुढे आणखी एक फोटो उर्फीनं शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीनं लिहिलं की, ‘,माझा पाय काळा, निळा पडलाय’ उर्फीच्या या स्टोरीमुळे तिचे चाहते काळजी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, उर्फी जावेदच्या कामाबद्दल सांगायचं तर उर्फीनं 2025 मध्ये ‘द ट्रेटर्स इंडिया’ हा शो जिंकला आणि त्याच वर्षी ‘एंगेज्ड: रोका या धोखा’ हा शोमध्ये दिसली. उर्फी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसौटी जिंदगी की 2’ आणि इतर अनेक कार्यक्रमांमध्ये दिसली आहे.