‘उरी’ची दुसऱ्या दिवशी छप्परफाड कमाई

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : 2016 साली जम्मू-काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा याच आठवड्यात प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. पहिल्या दोन दिवसांत या सिनेमाने 20.63 कोटींचा गल्ला जमवला आहे. सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी या सिनेमाच्या कमाईबाबत माहिती दिली. तरण आदर्श यांच्यानुसार, उरीला माऊथ पब्लिसिटीचा फायदा झाला […]

उरीची दुसऱ्या दिवशी छप्परफाड कमाई
Follow us on

मुंबई : 2016 साली जम्मू-काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा याच आठवड्यात प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. पहिल्या दोन दिवसांत या सिनेमाने 20.63 कोटींचा गल्ला जमवला आहे. सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी या सिनेमाच्या कमाईबाबत माहिती दिली.

तरण आदर्श यांच्यानुसार, उरीला माऊथ पब्लिसिटीचा फायदा झाला आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईत पहिल्या दिवसाच्या तुलनेत अधिक वाढ दिसून आली. भारतात प्रदर्शित होताच या सिनेमाने शुक्रवारी 8.20 कोटींचा व्यवसाय केला. तर शनिवारी 12.43 कोटींचा गल्ला जमवला. आता पर्यंत या सिनेमाने 20.63 कोटी कमवले आहेत. हा आकडा चित्रपट क्षेत्रातील तज्ञांच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहेत. तर येत्या दिवसांत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.


उरी- द सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा 2016 साली जम्मू-काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत आहे. यात अभिनेता विकी कौशल, अभिनेते परेश रावल, अभिनेत्री यामी गौतम हे मुख्य भूमिकेत आहेत, तर या सिनेमाच्या एका सीनमध्ये देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर देखील दिसत आहेत.

या सिनेमातील अभिनेता विकी कौशल याच्या भूमिकेची खूप चर्चा होते आहे. या सिनेमात लष्कराच्या एका अधिकाऱ्याची भूमिका तो निभावत आहे. या सिनेमात विकी कौशल हा एका वेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे, हा लूक त्याच्या इतर सिनेमांतील भूमिकांपेक्षा खूप वेगळा आहे. यात विकी कौशल जे.पी. दत्ता यांच्या बॉर्डर सिनेमातील सनी देओलची आठवण करवून देतो. तसेच यातील अभिनेते परेश रावल, अभिनेत्री यामी गौतम यांची भूमिकाही महत्वाची आहे. याचं दिग्दर्शन आदित्य धार यांनी केलं.

भारतीय सैन्याच्या उरी बेस कॅप्मवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 18 सप्टेंबर 2016 रोजी भ्याड हल्ला केला होता. यात भारताचे 19 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. याच सर्जिकल स्ट्रईकवर हा सिनेमा आहे.