तिसऱ्या दिवशीही ‘उरी’चा बॉक्स ऑफिसवर सर्जिकल स्ट्राईक

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : बॉलीवूड अभिनेता विकी कौशल हा सध्या त्याच्या ‘उरी’ सिनेमासाठी चर्चेत आहे. या सिनेमामुळे विकीचं सर्वत्र कौतूक होत आहे. या सिनेमामुळे विकी जितका हिट झाला, तितकाच हिट हा सिनेमा ठरत आहे. या सिनेमाने अवघ्या तीन दिवसांत छप्परफाड कमाई केली आहे. 2016 साली जम्मू-काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ हा […]

तिसऱ्या दिवशीही ‘उरी’चा बॉक्स ऑफिसवर सर्जिकल स्ट्राईक
Follow us on

मुंबई : बॉलीवूड अभिनेता विकी कौशल हा सध्या त्याच्या ‘उरी’ सिनेमासाठी चर्चेत आहे. या सिनेमामुळे विकीचं सर्वत्र कौतूक होत आहे. या सिनेमामुळे विकी जितका हिट झाला, तितकाच हिट हा सिनेमा ठरत आहे. या सिनेमाने अवघ्या तीन दिवसांत छप्परफाड कमाई केली आहे. 2016 साली जम्मू-काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा याच आठवड्यात प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दोन दिवसांत या सिनेमाने 20.63 कोटींचा गल्ला जमवला. तिसऱ्या दिवशी रविवारीही या सिनेमाने छप्परफाड कमाई केली. वाचा – अंगावर शहारे आणणारा ‘उरी’

उरी बेस कॅप्मवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यावर आधारीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडतो आहे. या सिनेमाचे सर्व शो हे हाऊसफूल जात आहेत. बॉक्स ऑफिस इंडियानुसार, या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याचं दिवशी शुक्रवारी 8.20 कोटींचा व्यवसाय केला, शनिवारी 12.43 कोटींचा गल्ला जमवला. तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी य सिनेमाने दोन्ही दिवसांच्या कमाईला मागे टाकत तब्बल 14.50 कोटींचा गल्ला जमवला. हा सिनेमा आपल्या पहिल्या वीकेंडमध्ये एकूण 35.13 कोटींचा व्यवसाय करण्यात यशस्वी ठरला.

‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा 2016 साली जम्मू-काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत आहे. यात अभिनेता विकी कौशल, अभिनेते परेश रावल, अभिनेत्री यामी गौतम हे मुख्य भूमिकेत आहेत.

या सिनेमातील अभिनेता विकी कौशल याच्या भूमिकेची खूप चर्चा होत आहे. या सिनेमात लष्कराच्या एका अधिकाऱ्याची भूमिका तो निभावत आहे. या सिनेमात विकी कौशल हा एका वेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे, हा लूक त्याच्या इतर सिनेमांतील भूमिकांपेक्षा खूप वेगळा आहे. तसेच यातील अभिनेते परेश रावल, अभिनेत्री यामी गौतम यांची भूमिकाही महत्वाची आहे. याचं दिग्दर्शन आदित्य धार यांनी केलं.

भारतीय सैन्याच्या उरी बेस कॅप्मवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 18 सप्टेंबर 2016 रोजी भ्याड हल्ला केला होता. यात भारताचे 19 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. याच सर्जिकल स्ट्रईकवर हा सिनेमा आहे.

आजवर भारतीय लष्करावर आधारीत अनेक सिनेमे आलेत, पण ‘उरी’ हा त्यासर्वांपेक्षा खूप वेगळा आहे. मनाला भिडणारं कथानक, योग्य कास्टिंग, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, त्यासोबतच देशभक्ती, उत्कंठा आणि अंगावर शहारे आणणारे दृश्य यासर्वांची सांगड घातलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे.