Ashvini Bhave : आत्मविश्वास आणि माज यात फरक…वंदना गुप्ते यांनी सांगितलेली अश्विनी भावे यांची खटकलेली गोष्ट, काय घडलेलं?

Vandana Gupte On Ashvini Bhave : अश्विनी भावे यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावलेली. यावेळी वंदना गुप्ते यांचा अश्विनींनबद्दल बाईट दाखवण्यात आला. यावेळी वंदना यांनी अश्विनी भावे यांची खटकलेली गोष्ट सांगितलेली.

Ashvini Bhave : आत्मविश्वास आणि माज यात फरक...वंदना गुप्ते यांनी सांगितलेली अश्विनी भावे यांची खटकलेली गोष्ट, काय घडलेलं?
| Updated on: Oct 02, 2026 | 4:30 PM

वंदना गुप्ते आणि अश्विनी भावे अनेक प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांच्या ‘गगनभेदी‘ या नाटकाचे खूप प्रयोग झाले. अश्विनी भावे यांचं हे पहिलं नाटक असून त्यांनी वंदना गुप्तेंसोबत पहिल्यांदा एकत्र काम केलेलं. त्यावेळी अश्विनी अवघ्या 16 वर्षांच्या होत्या. अशातच अश्विनी भावे यांनी झी मराठी वाहिनीवरील अवधूत गुप्तेच्या ‘खुप्ते तिथे गुप्ते‘ या कार्यक्रमात हजेरी लावलेली. यादरम्यान, वंदना गुप्ते यांचा बाईट दाखवण्यात आला. यावेळी वंदना यांनी अश्विनी भावे यांचं कौतुक करत त्यांची न आवडलेली गोष्टही सांगितली होती.

वंदना गुप्ते म्हणालेल्या की, ‘अश्विनीच्या बाबतीत सांगायचं म्हणजे तिने पहिल्यांदा करिअरमध्ये प्रवेश केला, तेव्हा तिनं माझ्यासोबत काम केलं. याबद्दल मला खूप आनंद आहे. त्यावेळी अश्विनी अगदी 16 वर्षांची होती. 10वीची परीक्षा संपवून ती नाटकात काम करत होती. अश्विनी खूप छान शिकते, जे अनुभवी कलाकार आहेत त्यांचं ऐकते.’

Loading...

वंदना गुप्तेंनी सांगितलेला किस्सा

पुढे वंदना म्हणाल्या की, ‘अश्विनीच्या बाबतीत खुपलेली गोष्ट म्हणजे, आमचा गडकरी रंगयातनला ‘गगनभेदी‘ या नाटकाचा प्रयोग होता. जवळजवळ त्या नाटकाचे 100 प्रयोग झालेले, तुझं नाव व्हायला लागलेलं. त्यानंतर तिनं एक नाटक करायला सुरुवात केली. त्यामुळे अश्विनीला आपण काहीतरी करतोय आणि लोकांना ते आवडतंय, यश मिळालंय, ह्याचा एक आत्मविश्वास आलेला. त्यावेळी तिच्या लक्षात येत नव्हतं, आत्मविश्वास आणि माज यात फरक काय आहे. तेव्हा गडकरीला प्रयोग असताना ती आधीच नाट्यगृहात आलेली आणि कोणाशी तरी बोलत होती. मी आले, गाडीतून उतरले, तिला हाय केलं, तेव्हा तिनं मान फिरवली आणि मला इग्नोर करून ती त्या माणसाशी बोलायला लागली. त्यानंतर, ती मेकअप रूममध्ये आल्यानंतर मी तिला म्हटलं, तू मला जर असा कोल्ड शोल्डर परत दिलास, तर मी आयुष्यात तुझ्यासोबत बोलणार नाही. त्यामुळे ती यातून शहाणपणा शिकली असेल.’

यावर अश्विनी भावे म्हणालेल्या की, ‘वंदना ताईकडून मी खूप काही शिकले, जर माझं काही चुकलं असेल तर सॉरी. ती खूप उत्साही आहे.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us