Varsha Usgaonkar : ती खंत कायम त्याच्या मनात राहिली…लक्ष्मीकांत बेर्डे यांची एक इच्छा राहिली अपूर्ण, वर्षा उसगांवकरांनी सांगितला प्रसंग

Varsha Usgaonkar on Laxmikant Berde : वर्षा उसगांवकर यांनी एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांची अपूर्ण राहिलेली इच्छा सांगितली आहे.

Varsha Usgaonkar : ती खंत कायम त्याच्या मनात राहिली...लक्ष्मीकांत बेर्डे यांची एक इच्छा राहिली अपूर्ण, वर्षा उसगांवकरांनी सांगितला प्रसंग
| Updated on: Oct 20, 2026 | 2:22 PM

वर्षा उसगांवकर यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं असून त्यांनी अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे. वर्षा उसगांवकर यांनी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्यासोबत काम केलं आहे. अशातच एका मुलाखतीत वर्षा उसगांवकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची एक न पूर्ण होऊ शकलेली इच्छा सांगितली. वर्षा उसगांवकर म्हणाल्या की, ‘आज लक्ष्या असता तर तो एका वेगळ्या पद्धतीने चमकला असता असं मला वाटतं. त्याचं अकाली निधन झालं असे मी म्हणेन.’

काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?

Loading...

‘लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मी ‘एक होता विदूषक’ हा चित्रपट केला होता. त्याआधी लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे कॉमेडी, कॉमेडी आणि फक्त कॉमेडी असं समजलं जायचं. लक्ष्याला तीच खंत होती की, माझा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना दिसला पाहिजे. जेव्हा दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी लक्ष्मीकांतला हा चित्रपट दिला, तेव्हा त्याने लगेच मला फोन केला. तो म्हणाला की, या चित्रपटात मला तू हवी आहेस. तू हा चित्रपट कर. कदाचित तुला मानधन कमी देतील. हा चित्रपट स्त्रीप्रधान नसेल, पण तू हा चित्रपट करावा अशी माझी इच्छा आहे.’

‘लक्ष्याने ज्या पद्धतीनं त्यात काम केलंय, ते मला खूप ‘टचिंग’ वाटलं. त्याचे सीन नसले तरी तो तिथे हजर असायचा. एक वेगळा लक्ष्या मला तिथे दिसला. त्या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत बेर्डेंना पुरस्कार मिळायलाच हवा होता. मला असं वाटलं की, त्यानं अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स केला होता. पण त्या वर्षीचा पुरस्कार त्याला मिळाला नाही. त्याला खूप वाईट वाटलं. त्याला कायम ती खंत वाटत राहिली की, या चित्रपटासाठी मला अवॉर्ड मिळायला पाहिजे होता.’

‘ते जर त्याला मिळाले असते, तर त्याच्या अभिनयाला एक वेगळा पैलू पडला असता. त्याच्या त्या विनोदी अभिनेत्याच्या चौकटीतून तो बाहेर आला असता.’ असंही वर्षा उसगांवकर शेवटी म्हणाल्या. ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत वर्षा उसगांवकर बोलत होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us