Dawood Ibrahim : अपमान करणाऱ्याला दाऊद इब्राहिम कधीच सोडत नाही…लेखकाचं अंडरवर्ल्ड डॉनबद्दल मोठं विधान
Vivek Agrawal On Dawood Ibrahim : ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक विवेक अग्रवाल यांनी एका मुलाखतीत दाऊद इब्राहिमबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

आदित्य धर दिगदर्शित ‘धुरंधर‘ आणि ‘धुरंधर 2′ हे सिनेमे प्रचंड गाजले. या सिनेमांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या सिनेमात दाऊद इब्राहिमची म्हणजेच ‘बडे साब‘ ची भूमिका अभिनेता दानिश इकबालनं साकारली होती. त्याची ही भूमिकाही खूप गाजली. ‘धुरंधर‘ या सिनेमामुळे दाऊद इब्राहिम पुन्हा चर्चेत आला होता. अशातच आता ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक विवेक अग्रवाल यांनी दाऊद इब्राहिमबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
काय म्हणाले विवेक अग्रवाल?
विवेक अग्रवाल यांनी नुकतीच ANI ला मुलाखत दिली. या मुलाखतीत विवेक यांना दाऊदबद्दल विचारण्यात आलं. तसेच बॉलिवूडचे कलाकार दाऊदच्या पार्ट्यांना जायचे, याबद्दलही विवेक यांनी भाष्य केलं. विवेक अग्रवाल म्हणाले की, ‘इतर कुणाच्याही पार्टीमध्ये जाण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे सगळे दाऊदच्याच पार्टीमध्ये जायचे. मी दाऊदची 38 नावं शोधली आहे. त्यातलं शेवटचं नाव ऐकलंय ते म्हणजे, ‘बडे हाजी‘
‘धुरंधर‘ सिनेमाबद्दल बोलताना विवेक म्हणाले की, ‘धुरंधर‘ सिनेमात पूर्ण नाव घेऊ शकत नव्हते म्हणून ‘बडे साब‘ असं नाव ठेवण्यात आलं. पूर्ण नाव घेतलं तर त्याचे काय परिणाम होतील, हे त्यांना माहित आहे. पुढेही त्याचे परिणाम होतील हे त्यांना माहित आहे. दाऊद कोणालाही सोडू शकतो पण, त्याचा अपमान करणाऱ्याला आणि त्याच्यापेक्षा कोणी मोठं होत असेल तर त्याला तो अजिबात सोडणार नाही. त्याचा मोठा भाऊ, लहान भाऊ असेल तरी तो सोडणार नाही. त्याच्या रागामुळे तो दाऊद इब्राहिम बनलाय. भारतात दुसरं कुणीही दाऊद इब्राहिम बनू शकलं नाहीये. त्यामागे त्याचा राग हेच एक कारण आहे. ‘धुरंधर‘ सिनेमाचा IAS ला काही फरक पडत नाही.
दरम्यान, अनेक अभिनेत्रींचं नाव दाऊद इब्राहिमसोबत जोडलं गेलं आहे. त्यापैकी एक म्हणजेच अभिनेत्री मंदाकिनी. मंदाकिनी आणि दाऊद यांचा एका सामन्यातील फोटो व्हायरल झालेला. यावर काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत मंदाकिनीनं भाष्य केलेलं. त्या फोटोचा गैरवापर करण्यात आला, असं अभिनेत्री म्हणाली.