PCOD आजारामुळे महिलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो का ? तज्ज्ञ काय सांगतात ?

आजकाल कमी वयातच अनेकींना पीसीओडीचा त्रास होताना दिसतो. या आजाराचे प्रमाण खूप वाढलेले दिसत आहे. हा त्रास कोणत्या कारणांमुळे होतो ते जाणून घेऊया.

PCOD आजारामुळे महिलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो का ? तज्ज्ञ काय सांगतात ?
Image Credit source: freepik
| Updated on: Jul 18, 2023 | 6:23 PM

PCOD and mental Health : खाण्या-पिण्याचा चुकीच्या सवयी, पोषक आहाराच अभाव आणि बैठी जीवनशैली या कारणांमुळे आजकाल बहुतांश महिलांना पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसीज अर्थात PCOD चा त्रास होताना दिसतो. अनेक महिला या आजाराला बळी पडतात. रिप्रोडक्टिव्ह वयात हा आजार महिलांमध्ये वेगाने पसरताना दिसत आहे.

सर्वात चिंतेची बाब म्हणजे PCOD या आजाराचा महिलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे वेळेवर तपासणी करून निदान झाल्यास पीसीओडीवर वेळीच उपचार करावेत, असा सल्ला डॉक्टर देत असतात. कारण हा आजार दीर्घकाळ राहिल्यास त्यामुळे नैराश्य किंवा डिप्रेशनही येऊ शकते.

अमेरिकेमध्ये दोन लाखांहून अधिक महिलांवर करण्यात आलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. या अभ्यासातून असे दिसून आले की ज्या महिला पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसीज अर्थात PCOD शी लढा देता आहेत किंवा ज्यांना हा त्रास होत आहे, त्या महिलांमध्ये एंग्झायटी तसेच डिप्रेशनचा धोका हा 10 टक्क्यांनी वाढतो.

हा आजार दीर्घकाळापर्यंत राहिल्यास त्याचा त्या महिलेच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. PCOD आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांमध्ये सेरोटोनिन हार्मोनची पातळी कमी होते, ज्याच्या त्यांच्या मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो.

PCOD म्हणजे काय ?

खराब जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी, व्यायामाचा अभाव आणि बैठी जीवनशैली हे बहुतांश आजारांसाठी कारणीभूत ठरते. खराब लाइफस्टाइल हेच पीसीओडी साठीदेखील कारणीभूत असते. या आजारामुळे महिलांच्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतात. प्रसंगी त्यांचे वजनही वाढते. त्यांच्या चेहऱ्यावर केस उगवू लागतात आणि मासिक पाळीही अनियमित होते.

पीसीओडीची ही समस्या दीर्घकाळापर्यंत राहिल्यास स्त्रियाही वंध्यत्वाच्या बळी ठरू शकतात. PCOD ग्रस्त महिलांमध्ये स्ट्रेस अर्थात मानसिक तणाव आणि एंग्झायटी किंवा चिंता हे त्रासही दिसून येतात. कारण पीसीओडीमुळे होणाऱ्या बदलांमुळे महिला अस्वस्थ होतात. परिणामी चिंता वाटू लागते, ज्याचे नैराश्यात किंवा डिप्रेशनमध्ये रुपांतर होऊ शकते.

ही परिस्थिती उद्भवल्यास डॉक्टरांना भेटा

जर एखाद्या महिलेला बऱ्याच काळापासून एखाद्या गोष्टीबद्दल काळजी वाटत असेल. किंवा तिच्या मनात नेहमी वाईट विचार येत असतील, अस्वस्थ वाटत असेल तर ही खराब मानसिक आरोग्याची लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत, त्वरित डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घ्यावा.