तुमच्या मुलीला दिली का ‘ही’ लस? लस द्या कॅन्सरपासून सुरक्षीत रहा

| Updated on: Jan 22, 2022 | 5:09 PM

कर्करोग म्हटलं की मनात भीती निर्माण होते. जगभरातील स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सवाईकल कॅन्सर हा खूप चिंतेचा विषय आहे. स्त्रियांमध्ये सामान्यत: हा कर्करोग चौथ्या क्रमांकावर आहे. संपूर्ण जगात जानेवारी महिना सवाईकल कर्करोगबाबत जागरूती महिना म्हणून पाळला जातो.

तुमच्या मुलीला दिली का ही लस? लस द्या कॅन्सरपासून सुरक्षीत रहा
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us on

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सवाईकल कॅन्सर (cancer) हा सर्वाधिक महिलांना (women) होतो. या कॅन्सरमुळे सगळ्यात जास्त महिलांचा मृत्यू होतो.  जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 2020 मध्ये केलेल्या एका सर्व्हेत हे लक्षात आलं की जगात जवळपास 6,04,000 महिलांना हा कर्करोग झाला होता. तर जवळपास 3,42,000 महिलांनी यामुळे आपला जीव गमावला होता. साधारण हा कर्करोग ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV)यामुळे होतो. हा पुरुषांनाही होऊ शकतो. आज या कर्करोगापासून वाचण्यासाठी लस निर्माण झाली आहे. मात्र या लसीबद्दल हवी तशी जनजागृती झाली नाही. आज आपण या कर्करोगाबद्दल आणि लसीबद्दल जाणून घेणार आहोत.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग

गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग ग्रीवा किंवा सर्विक्स जो गर्भाशयाच्या खालच्या बाजूस योनीमार्गात उघडतो. या ठिकाणी होणारं संक्रमण म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर.

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) म्हणजे काय?

HPV हा सामान्यपणे लैंगिक संबंधातून संक्रमित होतो. आपल्यापैकी 80% लोकांना आयुष्यात एकदातरी या विषाणूची बाधा होते. त्याची सहज लागण असून त्याचं संक्रमणही सहज होतं. पण तुम्ही HPV पॉझिटिव्ह असेल म्हणजे कॅन्सरचं झाला आहे असं नाही. कारण या व्हायरस 200 प्रकार आहेत. त्यात 14 प्रकार हे गंभीर आजारात मोडतात. त्यात या कॅन्सरचा समावेश आहे. साधारण HPV झालेल्या महिलांना काही उपचार न घेता ही बरा होत्यात. मात्र हा व्हायरस दीर्घ काळ तुमचा शरीरात राहिला आणि त्यातून जखम तयारीहून त्याकडे दुर्लक्ष झाल्यास तुम्हाला या कॅन्सरचा धोका अधिक असतो.

HPV होण्याची कारणं

1. त्वचेला झालेल्या जखमेतून हा विषाणू त्वेचपासून त्वचेच्या संपर्कात आल्यावर होतो
2. हा विषाणू ज्यांच्या शरिरात आहे अशा व्यक्तीने दुसऱ्यासोबत संभोग केल्यास होतो.
3. तोंडावाटे संभोग केल्यावर हा व्हायरस तोंडात आणि श्वसनमार्गात जाऊ शकतो.
4. लैंगिक संबंधात जास्त सक्रिय असणाऱ्या महिलांना याची लागण होऊ शकते.

HPV चे प्राथमिक लक्षणं

• मासिकपाळीच्या दिवसात अति-रक्तस्राव आणि वारंवार पाळी
• लैंगिक संबंध ठेवल्यानंतर रक्तस्राव
• योनीमार्गातून सतत पांढरा द्रव (White Discharge) येणे
• पांढरा द्रवाला घाणेरडा वास येणं
• वारंवार योनीमार्गाचं इंन्फेक्शन

HPVसाठी कुठली टेस्ट करावी

यासाठी पॅपस्मिअर ही टेस्ट करावी. साधारण वयाच्या 30 ते 65 वर्षांपर्यंत दर तीन वर्षांनी गर्भाशय मुखाची पॅपस्मिअर तपासणी करावी.

लसीद्वारे घाला या कॅन्सरला आळा

आपल्या भारतात कॅन्सरशी लढण्यासाठी सध्या दोन लशी उपलब्ध आहेत. भारतात बायव्हॅलेंट आणि क्वाड्रिव्हॅलेंट एचपीव्ही लसींला 2008 मध्ये मान्यता मिळाली आहे. म्हणजे आज जवळपास भारतात 14 वर्षांपासून कॅन्सरविरोधात लस उपब्धत आहे. मात्र आजही त्याप्रमाणात या लसीबद्दल जनजागृती नाही.

ही लस कधी घेता येते?

1. 9 ते 15 वयोगटातील मुलींसाठी लस घेण्याची योग वेळ
2. ही लस दोन डोसमध्ये दिली जात असून, साधारण या डोसमध्ये 6 महिन्यांचा फरक असतो
3. तुम्ही जर 25 वर्षांच्या आहात आणि ही लस घेतली नसेल तर तुम्हाला तीन डोस घ्यावे लागतील.
4. 25 वर्षांवरील मुली ही लस घेऊ शकतात मात्र याचा प्रभाव जास्त वेळ राहत नाही.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा

संबंधित बातम्या

काय तुम्हाला ‘ही’ लक्षणं दिसत आहेत, मग लिव्हरकडे लक्ष देणं गरजेचं आहे…जाणून घ्या ती लक्षणं एका क्लिकवर

Fitness tips: कोरोनात जिम बंद? टेन्शन नको, घरीच हे व्यायम करा आणि वजन घटवा

‘हे’ घरगुती उपाय आहेत थंडीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या विविध आजारांवर रामबाण इलाज