काय तुम्हाला ‘ही’ लक्षणं दिसत आहेत, मग लिव्हरकडे लक्ष देणं गरजेचं आहे…जाणून घ्या ती लक्षणं एका क्लिकवर

Health Tips लिव्हर हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. तो आपल्या शरीरात अनेक महत्त्वाची भूमिका निभवत असतो. लिव्हरचा आजार होणं किंवा लिव्हर खराब होणं यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. तसं तर लिव्हरचे आजार दारु प्यायलाने होतात. पण बाकी तसं काहीही सांगता येत नाही. कशामुळेही लिव्हरचा त्रास होऊ शकतो.

काय तुम्हाला 'ही' लक्षणं दिसत आहेत, मग लिव्हरकडे लक्ष देणं गरजेचं आहे...जाणून घ्या ती लक्षणं एका क्लिकवर
लिव्हर
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 12:22 PM

मुंबई: निरोगी आणि सुंदर राहण्यासाठी आपण आपल्या बाह्य अंग म्हणजे चेहरा, हात, पाय आणि केस आदीची काळजी घेतो. मात्र जर लिव्हर चांगला असेल तर तो आपल्याला अधिक सुंदर बनवतो. कारण लिव्हर आपल्या शरीरात महत्त्वाची भूमिका बजावतो. रक्तशुद्धीकरणापासून ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतो. त्यामुळे लिव्हरकडे लक्ष द्या. जर तुम्हाला ही लक्षणं दिसत असतील तर काळजी घ्या काळजी.

‘ही’ 12 लक्षणं तुम्हाला देतात लिव्हर आजाराबद्दल संकेत

1. कावीळ

जेव्हा त्वचा रंगरहित आणि डोळे पिवळी दिसतात तेव्हा तुम्हाला काळीव झाला आहे. अशावेळी लिव्हरवर परिणाम झाला असून पूर्वेपेक्षा तुमचं लिव्हर कार्यरत नसते. त्यामुळे लगेचच डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावा.

2. मळमळ आणि उलट्या

सतत तुम्हाला मळमळ आणि उलट्या होत असेल तर तुमचं लिव्हर व्यवस्थित काम करत नाही आहे. कारण शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्याचं काम लिव्हर करत असते. त्यामुळे अशावेळी तुम्हाला लिव्हरकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

3. पोटात दुखणे

पोटात दुखणे, खास करून पोटाच्या उजव्या भागात दुखणे. हे सगळ्यात मोठं संकेत आहे की तुमचं लिव्हरचा आजार होण्याची शक्यता आहे.

4. लघवीचा रंग बदलने

बिलीरुबिनचा स्तर वाढला तर लघवीचा रंग पिवळा होतो आणि खराब लिव्हर तो बाहेर काढू शकत नाही. अशावेळी लगेचच डॉक्टरांना याबद्दल सांगा.

5. मातीच्या रंगासारखा मल

जर लिव्हर पुरेशा प्रमाणात पित्त तयार करु शकत नाही तेव्हा तुम्हाला मातीच्या रंगासारखा मल होतो. 6. पायांना सूज

लिव्हरची समस्या असेल तर तुमच्या पायांवर सूज येते. ही सूज सतत असेल तर तुम्हाला डॉक्टरांशी संपर्क करायला हवा.

7. त्वचेत जळजळ

त्वचेवर खाज सुटणे हे लिव्हर खराब होण्याचे एक सामान्य लक्षण आहे.

8. भूक कमी लागणे किंवा वजन कमी होणे

लिव्हर खराब झाल्याने भूक कमी लागते ज्यामुळे तुमचे वजन कमी होऊ लागत.

9. थकवा

लिव्हर खराब झाल्यानंतर जेव्हा फेल होण्याच्या स्थितीत असतो तेव्हा तुम्हाला चक्कर येणे आणि थकवा जाणवायला लागतो.

10. सहज जखम

लिव्हरची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे किंवा तो फेल होण्याचा स्थित असल्याने तुम्हाला सहज जखम होऊ शकते. आणि त्यातून जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो.

11. उलटी किंवा मलमधून रक्त येणे

हे सगळ्यात मोठं लक्षण आहे की तुमचं लिव्हर खराब झालं आहे. त्यामुळे ताबडतोबर डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती तपासणी करुन घ्या.

12. पोट अचानक खूप फूगणे

यात रुग्णांचं पोट गर्भवती असल्यासारखं फूगतं. म्हणजे तुम्हाला सिरोसिस लिव्हरचा एक गंभीर आजार असण्याची शक्यता आहे. पोटाच्या आकाराकडे कायम लक्ष द्या. वजन वाढलं असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष करु नका.

हे प्या आणि लिव्हरला निरोगी ठेवा

1. गाजर ज्यूस 2. बीट ज्यूस 3. हिरव्या भाज्यांचा ज्यूस 4. ग्रीन टी 5. हळदीचा चहा

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा

संबंधित बातम्या

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.