महाराष्ट्रात 45 वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस द्या; केंद्राकडे मागणी

| Updated on: Mar 17, 2021 | 2:34 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढल्याने 45 वर्षांवरील प्रत्येकाला महाराष्ट्रात कोरोनाची लस दिली जावी, असा प्रस्तावच महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे दिला आहे. (coronavirus vaccines should be people above 45 years of age, maharashtra demand to center)

महाराष्ट्रात 45 वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस द्या; केंद्राकडे मागणी
narendra modi
Follow us on

नवी दिल्ली: महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढल्याने 45 वर्षांवरील प्रत्येकाला महाराष्ट्रात कोरोनाची लस दिली जावी, असा प्रस्तावच महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे दिला आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे हा प्रस्ताव ठेवला आहे. (coronavirus vaccines should be people above 45 years of age, maharashtra demand to center)

सध्या ज्यांना आजार आहे अशा 45 ते 60 वर्षा दरम्यानच्या लोकांना कोरोनाची लस टोचली जाते. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता 45 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिली पाहिजे, असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्राला दिला आहे. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक सादरीकरण केलं. त्यात येणाऱ्या काळात 45 वर्षांवरील सर्व लोकांना कोणत्याही सर्टिफिकेटशिवाय कोरोनाची लस टोचण्याची योजना असल्याचं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं. सध्या गंभीर आजार असलेल्यांना लस देण्यात येते. येणाऱ्या काळात ही अट हटविण्यात येणार आहे, असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं.

दुसरी लाट थोपवायची आहे

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी जनतेशीही संवाद साधला. काही राज्यांमध्ये कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. देशातील 70 जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 150 टक्के वाढ झाली आहे. आपल्याला कोरोनाची ही दुसरी लाट तात्काळ थोपवायची आहे. त्यासाठी आपल्याला निर्णायक पावलं उचलावी लागतील, असं मोदींनी सांगितलं.

छोटा शहरातील टेस्टिंग वाढवावी लागेल

यावेळी मोदी यांनी पुन्हा एकदा छोट्या शहरात टेस्टिंग वाढवण्यावर भर दिला. लहान शहरांमध्ये रेफरल सिस्टिम आणि अॅम्ब्युलन्स नेटवर्कवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला पाहिजे. तसेच हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडाला मास्क लावणे आदी गोष्टींवर भर दिला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

लस वाया घालवू नका

लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. तेलंगणा, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेशात दहा टक्के कोरोना व्हॅक्सीन वाया घालविण्यात आल्या आहेत. असा प्रकार होता कामा नये, असं सांगतानाच देशात आपण दररोज 30 लाख लसीकरण करत आहोत. या लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. त्यासाठी व्हॅक्सीन वाया घालवण्याचे प्रकार थांबवले पाहिजे, असं ते म्हणाले. (coronavirus vaccines should be people above 45 years of age, maharashtra demand to center)

 

संबंधित बातम्या:

54 लाख लस दिल्या, मग आतापर्यंत 23 लाख लसच का टोचल्या?; लसीकरणावरून जावडेकरांचा महाराष्ट्र सरकारला ‘डोस’

महाराष्ट्रात 24 तासात 15,051 नवे कोरोना रुग्ण, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

कोव्हिड19 च्या काळात टीबी झाल्यास काय करायचे?

(coronavirus vaccines should be people above 45 years of age, maharashtra demand to center)