तुम्हालाही रात्री वारंवार लघवीला उठावे लागते? ही या आजाराची लक्षणे तर नाहीत…

| Updated on: Feb 22, 2022 | 11:07 AM

रात्री वारंवार लघवी होणे हे शरीरात काही तरी बिघाड झाला असल्याचे संकेत देत असते. वेळीच याची लक्षणे ओळखली नाही तर, याची मोठी किंमत शरीराला मोजावी लागू शकते. त्यामुळे तुम्हालाही हा त्रास होत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वारंवार लघवी होण्याच्या या समस्येला वैद्यकीय भाषेत ‘नॉक्चुरिया’ म्हणतात.

तुम्हालाही रात्री वारंवार लघवीला उठावे लागते? ही या आजाराची लक्षणे तर नाहीत...
फाईल फोटो
Follow us on

रात्री अनेकदा पोटात दुखून येते. जाग आल्यावर लघवी लागल्याचे जाणवते. काही वेळा रात्रीतून दोनपेक्षा अधिक वेळा लघवीला जावे लागत असते. अशी लक्षणे (Symptoms) तुम्हालाही जाणवत असल्यास ही कुठल्यातरी आजाराची तर लक्षणे नाहीत ना? हे तपासणे महत्वाचे ठरत असते. रात्री नेहमीपेक्षा जास्त लघवी होण्याच्या या समस्येला वैद्यकीय भाषेत ‘नॉक्चुरिया’(Nocturia) असे म्हणतात. डॉक्टरांच्या मते, रात्री एक किंवा दोनदा लघवीला जाणे सामान्य आहे, परंतु वारंवार लघवी (urinate) होणे हे आरोग्यात काही तरी बिघाड असल्याचे लक्षण आहे. रात्री वारंवार लघवीचा त्रास होत असेल आणि शरीरात काही वेगळे बदल जाणवत असतील, तर डॉक्टरांशी संपर्क साधाचा, उशीर झाल्यास पुढे याचे घातक परिणाम ठरु शकतो.

तज्ज्ञांच्या मते, रात्री लघवी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यामागे कॅफिन, अल्कोहोल, धूम्रपान, तणाव किंवा चिंता हे देखील कारण असू शकते. चहा, कॉफी आणि अल्कोहोलिक किंवा कॅफिनयुक्त पेये ही लघवीचे प्रमाण वाढवणारी असतात. त्याचे अतिसेवन झाल्याने शरीरात लघवी निर्मितीची प्रक्रिया सामान्यत: जास्त प्रमाणात होत असते. ही समस्या ‘नॉक्चुरिया’च्या आजाराशी देखील संबंधित असू शकते. सहसा हा आजार फारसा धोकादायक नसतो.

‘नॉक्चुरिया’चा आजार वृद्धत्व आणि हार्मोन्समधील बदलांशी संबंधित आहे. पण काही वेळा त्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येत असतात.‘एनएचएस’नुसार, नॉक्टुरिया ही अनेकदा मूत्रमार्गाच्या संसर्गाची किंवा मूत्रमार्गाच्या संसर्गाची गुंतागुंत असू शकते, त्यामुळे ओटीपोटात दुखणे किंवा लघवीला त्रास होऊ शकतो. याशिवाय रात्री वारंवार लघवी होण्याची समस्या देखील ‘प्रोस्टेट कर्करोगा’शी संबंधित असू शकते. अनेकदा मधुमेह असल्यावरही रात्री वारंवार लघवी लागू शकते. टाईप 2 मधुमेहाचे हे सामान्य लक्षण आहे. वजन कमी होणे, गुप्तांगाजवळ खाज येणे, तहान लागणे या लक्षणांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

रात्री लघवी होण्याची कारणे
1) प्रोस्टेट किंवा पेल्विक क्षेत्रातील ट्यूमर

2) किडनी संसर्ग

3) श्वसनक्रिया बंद झाल्यामुळे

4) मल्टिपल स्क्लेरोसिस, पार्किन्सन्स रोग

5) पाठीचा कणा संकुचित होणे यासारखे मज्जासंस्थेचे विकार

6) ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया

अशी घ्या काळजी

रात्रीच्या वेळी तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागत असेल तर, काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी दोन ते चार तास आधी पाणी कमी प्या. अल्कोहोल किंवा कॅफिनचे सेवन करू नका. मसालेदार, आम्लयुक्त अन्न, चॉकलेट किंवा मिठाई यासारख्या गोष्टी टाळा. या समस्या टाळण्यासाठी पेल्विक फ्लोर व्यायाम करा.

तुम्हीही फ्रिजमधील पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा… समोर आले गंभीर परिणाम

केसांच्या समस्यांवर कोरफड ठरते रामबाण उपाय, असा करा वापर…

काय सांगतात तुमचे डोळे? जाणून घ्या एका क्लिकवर