लातूरमधील डॉक्टरांनी सांगितली कोरोनाची नवी लक्षणे, तुम्हालाही ‘हा’ त्रास जाणवतो?

| Updated on: Apr 20, 2021 | 1:24 PM

मराठवड्यातील लातूर जिल्ह्यातही (Latur Corona) मोठ्या प्रमाणात संसर्ग आहे. उदगीर तालुक्यात सध्या बेड मिळत नाहीत.

लातूरमधील डॉक्टरांनी सांगितली कोरोनाची नवी लक्षणे, तुम्हालाही हा त्रास जाणवतो?
Dr. Shyam hibane Latur
Follow us on

लातूर : संपूर्ण जगभरात कोरोनाचा उद्रेक (CoronaVirus) पाहायला मिळत आहे. त्यातच भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दररोज नवनवे विक्रम गाठत आहे. मराठवड्यातील लातूर जिल्ह्यातही (Latur Corona) मोठ्या प्रमाणात संसर्ग आहे. उदगीर तालुक्यात सध्या बेड मिळत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी आता काळजी घेण्याची गरज आहे. (Dr Shyam Hibane Latur tells New symptoms of Coronavirus )

उदगीरच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये (Life care hospital) बेड फुल्ल आहेत. वाढती रुग्णासंख्या पाहून आणखीन 75 बेडची निर्मिती सुरू आहे. लातूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या मोठी आहे. अनेक नागरिक ताप आल्यानंतर अंगावर काढतात. अनेक रुग्णांचे स्कोर 12 च्या पुढे आहे. त्यामुळे व्हेंटिलेटरची गरज वाढली आहे. मधल्या काळात नागरिकांनी निष्काळजीपणा केला. लग्न समारंभ , विविध कार्यक्रम, सभा यामुळे रुग्ण संख्या वाढली. थकवा, सारी, अंगदुखी, उलटी होणं, जुलाब ही नवी लक्षणे आहेत, असं डॉ. श्याम हिबाने, अति दक्षता विभाग तज्ञ यांनी सांगितलं.

नवी लक्षणे

प्राथमिक लक्षणे सर्दी खोकला ताप आहेत. पण नव्या गाईडलाईनुसार, जुलाब, लूज मोशन, हातपाय दुखणे, अतिशय थकवा वाटणे ही नवी लक्षणे आढळत आहेत. नव्या रुग्णांमध्ये लूज मोशन हे नवं लक्षण आढळत आहे. पूर्वी सर्दी खोकला, ताप ही लक्षणे होतं, आता जुलाबही होत आहेत. त्यामुळे लोकांना ही लक्षणे जाणवायला लागली तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा, असं आवाहन डॉ. श्याम हिबाने यांनी केलं.

दुसरी लाट भीषण

कोरोनाची दुसरी लाट फारच भीषण आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. बेड मिळत नाहीत, इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे काळजी घेणे हेच उत्तम आहे. काही लोक ताप, सर्दी, खोकला अंगदुखी काही दिवस अंगावर काढतात. मग 5-6 दिवसांनी ते डॉक्टरकडे जातात सीटी स्कॅनमध्ये त्यांचे स्कोर 12 ते 20 पर्यंत येतं. त्या पेशंटना व्हेंटिलेटर लागतात. संसर्गाचं प्रमाण खूप वाढलं आहे. सर्दी, खोकला, ताप असेल तर तातडीने डॉक्टरकडे जा. टेस्ट करा, पहिल्या टप्प्यावरच चाचणी करुन उपचार केले तर लगेच पेशंट बरा होतो, असं डॉ. श्याम हिबाने म्हणाले.

संबंधित बातम्या 

तुम्ही जर कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलात, तर किती वेळात तुम्हाला संसर्ग होऊ शकतो?   

Coronavirus Symptoms तुम्हाला कोरोना होऊन गेलाय हे कसं ओळखायचं?

दोन नव्या लक्षणांमुळे कोरोनाबाधितांचं टेन्शन वाढलं, तोंड तर कोरडं पडत नाहीय ना?