तुम्ही जर कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलात, तर किती वेळात तुम्हाला संसर्ग होऊ शकतो?

देशभरात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात तर रोज कोरोना (Covid 19) रुग्णसंख्येचा उच्चांक पाहायला मिळत आहे.

तुम्ही जर कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलात, तर किती वेळात तुम्हाला संसर्ग होऊ शकतो?
सांकेतिक फोटो
सचिन पाटील

|

Apr 15, 2021 | 1:37 PM

मुंबई : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात तर रोज कोरोना (Covid 19) रुग्णसंख्येचा उच्चांक पाहायला मिळत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात 1 मेपर्यंत संचारबंदी (Maharashtra Sanchar Bandi) लागू करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात आजपासून कडक निर्बंध लागू झाले आहेत. (New coronavirus strain more powerful virus spread within a minute from positive patient says expert)

कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने का वाढत आहे, त्याची चकीत करणारी माहिती समोर आली आहे. सध्याचा कोरोनाचा स्ट्रेन इतका शक्तीशाली आहे की, कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर केवळ 60 सेकंद म्हणजेच एका मिनिटात तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच आख्खी कुटुंबच्या कुटुंब बाधीत होत आहेत.

1 मिनिटात संसर्ग 

एनबीटीच्या रिपोर्टनुसार, दिल्लीतील प्रसिद्ध डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली. त्यांच्या मते कोरोनाचा सध्याचा व्हायरस प्रचंड वेगाने पसरत आहे. रुग्णाच्या संपर्कात येतच अल्पावधित म्हणजे केवळ 1 मिनिटात तो दुसऱ्याला बाधित करतो.

मागील वर्षी जी कोरोनाची लाट होती, त्यावेळी असा प्रकार नव्हता. मात्र यावेळी जी लाट आलेली आहे ती अत्यंत धोकादायक आणि शक्तीशाली आहे. पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर संसर्ग होण्यासाठी किमान 10 मिनिटे लागत होते. मात्र यावेळच्या लाटेत हा अवधी घसरुन 1 मिनिटावर आला आहे. महत्त्वाचं म्हणजे 30 ते 40 या वयोगटातील तरुणांना सर्वाधिक संसर्ग होत आहे. त्याचं कारणही साहजिक आहे, ते म्हणजे हाच वर्ग सर्वाधिक घराबाहेर असतो.

संपूर्ण कुटुंबाला बाधा

जर घरातील एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला, तर सध्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना आपल्या कवेत घेतो. कुटुंबच्या कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह येत आहे. आधी कोरोना रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मात्र आता रुग्णांना उलटी आणि जुलाब होत आहेत. इतकंच नाही तर काहींना त्वचेवर लाल चट्टेही उमटत आहेत.

मुंबईत 5 स्टार हॉटेलचं रुग्णालयात रुपांतर

राज्यातील कोरोना स्थिती विदारक होत चालली आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईतील कोरोना संख्या नियंत्रणात यावी, यासाठी पालिकेकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहे. मुंबईत आता कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी पंचतारांकित हॉटेलचा वापर केला जाणार आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येत घट होण्यास मदत होणार आहे. मुंबई महापालिकेने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.

संबंधित बातम्या

मुंबईत पंचतारांकित हॉटेलचे रुग्णालयात रुपांतर, एका दिवसाचे शुल्क किती?

कोरोनाने पतीचा अखेरचा श्वास, दोन मुलींना घरी ठेवून पत्नीची मुलासह आत्महत्या

(New coronavirus strain more powerful virus spread within a minute from positive patient says expert)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें