AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाने पतीचा अखेरचा श्वास, दोन मुलींना घरी ठेवून पत्नीची मुलासह आत्महत्या

पतीच्या पश्चात जगण्याची कल्पना असह्य झाल्याने पत्नीनेही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. (Nanded Husband Dies wife commits Suicide )

कोरोनाने पतीचा अखेरचा श्वास, दोन मुलींना घरी ठेवून पत्नीची मुलासह आत्महत्या
नांदेडमध्ये पतीच्या निधनानंतर पत्नीची आत्महत्या
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 15, 2021 | 12:09 PM
Share

नांदेड : कोरोनामुळे पतीचं निधन झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीने मुलासह आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान पतीची प्राणज्योत मालवल्याचं समजताच पत्नीने थेट तलाव गाठला. दोन मुलींना घरी ठेवून तिने धाकट्या मुलासह आयुष्य संपवलं. (Nanded Husband Dies of Corona wife commits Suicide with Son)

तेलंगणाहून मोलमजुरीसाठी आलेलं दाम्पत्य

तेलंगणातून गंदम कुटुंब नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात मजुरीसाठी आलं होतं. बालाजी मंदिराच्या पाठीमागे राहून मजुरी करत ते उदरनिर्वाह करत होते. दरम्यानच्या काळात 40 वर्षीय पती शंकर गंदम यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांना लोहा येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु मंगळवारी उपचारादरम्यान शंकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

पतीनिधनाच्या वृत्तानंतर पत्नीवर दुःखाचा डोंगर 

पतीच्या निधनाची बातमी समजताच पद्मा गंदम यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पतीच्या पश्चात जगण्याची कल्पना असह्य झाल्याने त्यांनीही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांचा मुलगा लल्ली याच्यासह पद्मा यांनी सुनेगाव येथील तलाव गाठलं. दोघी मुलींना घरी ठेवून त्यांनी धाकट्या लेकासह तलावात उडी घेतली.

लोहा शहरातील बालाजी मंदिराच्या पाठीमागे ही करुण घटना घडली. बुधवारी पहाटे मायलेकाने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांकडून आत्महत्येचं कारण स्पष्ट

पतीच्या अकस्मात निधनानंतर तीन मुलांसह संसाराचा गाडा कसा चालवायचा, या चिंतेतून महिलेने आत्महत्या केली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. फिर्यादी चिन्नना दुर्गना गंदम यांच्या फिर्यादीवरुन लोहा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक भागवत जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक काऱ्हे हे पुढील तपास करत आहेत

संबंधित बातम्या :

तो मस्करी करतोय, असं वाटलं, बायको व्हिडीओ बनवत राहिली, पाहतापाहता तो खरंच पंख्याला लटकला

बदलीमुळे नाराजी, कोल्हापुरात पोलिस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

(Nanded Husband Dies of Corona wife commits Suicide with Son)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ