AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharukh Khan : शाहरूख खानच्या मनगटावर कोट्यवधींचं घड्याळ, जगात फक्त 22 लोकांकडे असलेलं हे खास मॉडेल पाहून चाहतेही थक्क

शाहरूखच्या हातातील एका खास घड्याळ्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या घडाळ्याची किंमत तब्बल 1.8 कोटी रूपये असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, या घड्याळाच्या बेबी ब्लू रंगाच्या खास प्रकाराचे जगभरात केवळ 22 नग तयार करण्यात आले आहेत.

Sharukh Khan : शाहरूख खानच्या मनगटावर कोट्यवधींचं घड्याळ, जगात फक्त 22 लोकांकडे असलेलं हे खास मॉडेल पाहून चाहतेही थक्क
shahrukh khan watchImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 14, 2026 | 4:01 PM
Share

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आपल्या अभिनयासोबतच स्टाईल आणि आलिशान जीवनशैलीमुळेही नेहमी चर्चेत असतो. कधी त्याच्या महागड्या गाड्यांची चर्चा होते, तर कधी त्याच्या कपड्यांची तर कधी अॅक्सेसरीजची. आता शाहरूखच्या हातातील एका खास घड्याळ्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या घडाळ्याची किंमत तब्बल 1.8 कोटी रूपये असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, या घड्याळाच्या बेबी ब्लू रंगाच्या खास प्रकाराचे जगभरात केवळ 22 नग तयार करण्यात आले आहेत.

शाहरूख खानच्या 61 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान त्याच्या हातात निळ्या रंगाच्या डायलचं हे घड्याळ दिसलं. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या मनगटावरील या घड्याळाने अनेकांचं लक्ष वेधलं. वॉच स्पॉटिंग वेबसाईट ‘वॉच पापाराझी’ ने या घड्याळाची ओळख स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध लक्झरी वॉच कंपनी ग्रबेल फोर्से च्या बॅलन्सियर 3 या मॉडेलच्या रूपात केली आहे.

या घड्याळाची रिपोर्टेड लिस्ट प्राईस 2 लाख 5 हजार अमेरिकन डॉलर आहे. भारतीय रूपयांमध्ये ही किंमत साधारण 1.8 कोटी रूपये होते. मात्र ही रिपोर्टमध्ये नमूद केलेली किंमत आहे. शाहरूखने हे घड्याळ यात किमतीला खरेदी केलं आहे. याची अधिकृत माहिती समोर आली नाही.

या घड्याळाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा ओपनवर्क डायल. सामान्य घड्याळांमध्ये आतील यंत्रणा लपवलेली असते. मात्र या घड्याळात आतील छोटे- मोठे भाग आणि यंत्रणा उघड्या डायलमधून पाहता येतात. बेबी ब्लू रंगाचा डायल आणि टायटॅनियमची बॉडी यामुळे त्याचा लूक आणखी खास दिसतो. पण या घड्याळात हाताने चावी भरावी लागणारी यंत्रणा आहे. म्हणजेच हे बॅटरीवर चालणारं घड्याळ नाही. त्याच्या यंत्रणेत एकूण 282 भाग आणि 43 ज्वेल्स वापरण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, बेबी ब्लू डायल असलेल्या या विशिष्ट प्रकारचे केवळ 22 नग तयार करण्यात आल्याचं वॉच पापाराझींच्या माहितीत नमूद आहे. त्यामुळे शाहरूखच्या मनगटावर दिसलेलं हे घड्याळ केवळं महागडं नसून दुर्मिळही आहे. त्याच्या किंमतीपासून ते त्यातील क्लिष्ट यंत्रणेपर्यंत प्रत्येक गोष्ट सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

Follow Us
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!
विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; नेमकं काय..
Sanjay Raut On NCP Merger : विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; असं काय म्हणाले?
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट,
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट, अजित गव्हाणेंचा गंभीर आरोप!