AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होय, अजितदादा विलिनीकरणाबाबत माझ्याशी बोलले होते, अजितदादा गटाच्या आमदाराने फोडला बॉम्ब

अजित पवार गटाच्या आमदाराने राष्ट्रवादी विलिनीकरणावर नवा गौप्यस्फोट केला आहे. 'अजितदादा निधन होण्यापूर्वीच विलिनीकरणाबाबत माझ्यासोबत बोलले होते', असा दावा त्यांनी केला. सुप्रिया सुळेंनी विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळल्यानंतरही हा बॉम्ब टाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे राष्ट्रवादीतील नेमके काय चालले आहे, यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

होय, अजितदादा विलिनीकरणाबाबत माझ्याशी बोलले होते, अजितदादा गटाच्या आमदाराने फोडला बॉम्ब
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2026 | 3:36 PM
Share

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चेचा बाजार अजूनही सुरूच आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यानंतरही त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललं काय? अशी चर्चा रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच अजितदादा गटाचे आमदार इद्रिस नायकवाडी यांनी नवीन बॉम्ब टाकला आहे. निधनापूर्वी अजितदादा विलिनीकरणाबाबत माझ्याशी बोलले होते. अजितदादा असतानाच विलिनीकरणाच्या हालचाली सुरू होत्या, असा दावा इद्रिस नायकवाडी यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्याला हवा मिळाली आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबाबत अजित पवारांनी आपल्याजवळ सूचक विधान केलं होतं, अशी माहिती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी दिली आहे. अजितदादांचा मृत्यू होण्याआधी काही दिवसांपूर्वी अजितदादांची भेट झाली होती. तेव्हा दादांनी आमच्या पक्षात नसणाऱ्या एका सहकाऱ्याशी संबंध कसे आहेत? अशी विचारणा केली होती. त्यावर मी कशासाठी? असा अजितदादांना सवाल केला होता. त्यावर, भविष्यात आपल्याला एकत्र यावं लागेल, असं सूचक वक्तव्य अजितदादांनी केलं होतं, असं इद्रिस नायकवाडी यांनी म्हटलं आहे. ते मिरज येथे मीडियाशी संवाद साधत होते.

दादा जिवंत असतानाच…

दादा जिवंत असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाच्या हालचाली सुरू होत्या, असंही नायकवाडी यांनी म्हटलंय. सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच इद्रिस नायकवडी यांनी हे विधान केल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मात्र, नायकवाडी यांनी सध्याच्या घडामोडीवर अधिक भाष्य केलं नाही.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

दरम्यान, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. माझा भाऊ गेला तिथेच विषय संपला. आमच्यासाठी विलिनीकरणाचा विषय संपलेला आहे. आमच्याकडून कोणी चर्चा करत नाहीये. आणि समोरून काही प्रस्ताव आलेला नाहीये. त्यामुळे विलिनीकरणाचा प्रश्नच नाहीये. आम्ही संसदेत सर्व खासदार एकमेकांना भेटत असतो. संसदेच्या समित्यांच्या बैठकीला एकत्र असतो. त्यावेळी एकमेकांशी भेटणं होतं. याचा अर्थ विलिनीकरणावर चर्चा केली असा होत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांना भेटल्या

विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. या बैठकीत विलिनीकरणावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. मात्र, कुणीही त्याला दुजोरा दिलेला नाही.

Follow Us
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!
विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; नेमकं काय..
Sanjay Raut On NCP Merger : विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; असं काय म्हणाले?
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट,
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट, अजित गव्हाणेंचा गंभीर आरोप!