AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर आतली बातमी फुटलीच? विलिनीकरणावर विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान, कुणाला मंत्रिपद…

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणावर महत्त्वाचा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, विलिनीकरणाच्या चर्चांमध्ये काही प्रमाणात तथ्य असून, काही गोष्टी ठरल्या आहेत, ज्याला आमचा विरोध आहे. सत्तेसाठी भुकेलेले लोक जनतेच्या मताचा अनादर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

अखेर आतली बातमी फुटलीच? विलिनीकरणावर विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान, कुणाला मंत्रिपद...
vijay wadettiwarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2026 | 12:40 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या बातम्या येत आहेत. शरद पवार गटाने विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तर अजितदादा गटाकडून अजितदादांचे दाखले देऊन विलिनीकरणाचे भाष्य केलं जात आहे. त्यामुळे विलिनीकरणाबाबतचा संभ्रम अजून कायम आहे. मात्र, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अखेर आतली बातमी फोडली आहे. विलिनीकरणाच्या चर्चेत काही प्रमाणत तथ्य आणि सत्य आहे. जवळपास काही गोष्टी ठरल्या आहेत. त्याला आमचा विरोध आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे विलिनीकरण होणार का? अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. यात जवळपास काही गोष्टी झालेल्या आहेत. त्याला आम्ही विरोध करत होतो. पवार साहेब थकलेले आहेत. त्यांची प्रकृती ठीक नाही. कुणाला मंत्रिपद मिळणार? कोण केंद्रात मंत्री होणार? विलानीकरण होणार याची जोरात चर्चा सुरू आहे. काही प्रमाणात त्यात सत्य आणि तथ्य आहे. आमच्याकडे ठोस पुरावा नाही आणि याचं कोणी खंडन करतानाही दिसत नाही. त्यांनी जाणार की नाही हे स्पष्ट करावं. त्यात आम्ही पडणार नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

चुकीचा निर्णय घेतल्यास…

ते पुरोगामी विचाराला घेऊन राहतील की जातीवादी धर्मांधांशी जुळवून घेईल त्यांच्याशी आमचा संबंध नाही. जनता अशा लोकांना चुकीचा निर्णय घेतल्यास जागा दाखवेल. निर्णय होता ना काय होतं यावर महाराष्ट्राचं आणि आमचं लक्ष आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

अंगाची खाज मिटवण्यासाठी

विलानीकरणाशी आमचा काही संबंध नाही. सत्तेसाठी काही लोक भुकेले आहेत. त्यांना अन्नपाणी गोड लागत नाही. सत्तेशीवाय त्यांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे अंगाची खाज मिटवण्यासाठी चिखलात बसतील. त्यांची सत्तेत जाण्याची मानसिकता आहे. ही मानसिकता महाराष्ट्राच्या जनतेशी बेइमानी आहे. दिलेल्या मताचा अनादर आहे. हे लोक सत्तेत सामील होणार असतील तर, ज्यांच्या विरोधात जनतेने मतदान केले, त्याचा अनादर होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

भाजपच्या ताटाखालची मांजरं

अजितदादा गटातील काही लोक भाजपच्या ताटाखालचे मांजरं झाली आहेत. जेवढं उरलं असेल तेवढं खातात आणि ढेकर देतात. महाराष्ट्रातील जनतेपासून हे लपून राहिलं नाही. मला त्यांची नाव घ्यायची गरज नाही. काही लोकांनी सत्तेबरोबर जावं, अशी त्यांची इच्छा आहे. आपल्या पापावर त्यांना पांघरून घालायचं आहे. हे लोक बेईमान आहेत. महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. पण आमची भूमिका वेट अँड वॉचची आहे. देश विकणाऱ्यांच्या सोबत जात असाल तर जनता मतदानाच्यावेळी जागा दाखवेल, असंही त्यांनी म्हटलंय.

Follow Us
अजितदादांचा अपघात की घातपात? मुंबईत मफलर असलेलं पोस्टर झळकलं....
Ajit Pawar : अजितदादांचा अपघात की घातपात? मुंबईत मफलर असलेलं पोस्टर झळकलं; 16 नोव्हेंबरला रोहित पवार मोठा खुलासा करणार?
भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना....
Supriya Sule On NCP Merger : भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना पूर्णविराम!
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; पटेल भेटीवर...
Supriya Sule On Praful Patel Meeting : अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; प्रफुल्ल पटेल भेटीवर सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
Supriya Sule On NCP Merger : विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण, राष्ट्रवादीच्या चर्चांना पूर्णविराम?
ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले
Aaditya Thackeray : ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; राऊत नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून शिंदेंचा
Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
Jensen Huang : CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
जळगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16..
Jalgaon : जळगाव जिल्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16 वाजता जमीन थरथरली; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम....
Pune : पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम चित्रपटाच्या शूटिंगवरून नवा वाद