AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही म्हणाल भाजपचं कौतुक करताय, पण…; खासदार सुप्रिया सुळे थेट बोलल्या

सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणवावर भाष्य केलं. तसेच राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या तर्क-वितर्कावर देखील रोखठोक भाष्य केले.

तुम्ही म्हणाल भाजपचं कौतुक करताय, पण...; खासदार सुप्रिया सुळे थेट बोलल्या
supriya sule newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 14, 2026 | 12:12 PM
Share

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर जोदार चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकी सुरू असल्याचाही दावा केला जात आहे. त्यानंतर शरद पवार गट थेट एनडीएत सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यात प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यात संसद परिसरात 35 मिनिटे चर्चा झाल्याचा दावा करण्यात आहेत. या सर्व घडामोडींवर सुप्रिया सुळे यांनी रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली, सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सुप्रिया सुळे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी सुळे म्हणाल्या, ‘तर्क-वितर्क हे राजकारणात रोज चालतात. तर ब्रेकिंग न्यूजमध्ये उत्सुकता कशी निर्माण होणार. सकाळचा अनुभव गमतीने सांगते. मी सकाळी सात वाजता जॉगिंगसाठी जाते. तोपर्यंत सवा आठ पर्यंत सर्व कॅमेरामन तयारीत असतात. मला बातमीविषयी विचारल्यानंतर साहेबांच्या पीए यांना विचारण्यास सांगितलं. मला तीन-चार संपादकाचे घाईघाईने फोन आले. मी तातडीने पत्रकार परिषद बोलावली नव्हती’.

‘मी आजही सांगते की, आता परत परत तेच प्रश्न विचारू नका. तुम्ही तुमचा टीआरपी घाालवाल आणि माझाही घालवाल. मला माझा टीआरपी घालवायची इच्छा नाही. मला या विषयाचा कंटाळा आला आहे. या देशात महागाई वाढत आहे. तेलाच्या किंमती वाढत आहे. अमेरिकेतील प्रशासनात बदल झालेत. त्याचे जगावर परिणाम होत आहे. केंद्र सरकार मोठी बिल आणत आहेत. वन इलेक्शन आणि वन नेशनचा विषय सुरू आहे. देशात सगळया प्रक्रियेत सर्व लोक आहेत. मला त्याच्यावर प्रश्न विचारले तर आनंद वाटेल. विलीनीकरणावर आता उत्तर देणार नाही. माझा भाऊ आणि माझं… फक्त मी नव्हे, तर माझ्या पक्षातील सर्व नेत्यांची अजितदादांशी चर्चा झाली होती. त्याचा व्हिडिओ देखील आहे. मागील वर्षभरात अनेक सुखद प्रसंग माझ्या मोबाईलमध्ये आहेत.  माझ्या भावाच्या नात्याचा ओलावा आणि आठवणी आहेत. माझा भाऊ होता, तोपर्यंत विलीनीकरणाची चर्चा होती. तारीख ठरली होती, असे सुळे म्हणाल्या.

‘अजितदादा गेला, तेव्हापासून माझ्या पक्षाकडून विलीनीकरणाला फुलस्टॉफ देण्यात आला. तेव्हापासून आमच्याकडून विलीनीकरणावर एकही विधान केलेलं नाही. आमचा एकही प्रवक्ता कोणीही यावर बोलला नाही. अजित पवार गटाकडून आलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिलेलं नाही. आमच्यासाठी भावनिक मुद्दा आहे. माझं नातं भावाशी होते. प्रेमाचं नातं अबाधित राहील. एकत्र पुढे जायचं, ते भावासोबत ठरलं होतं. भाऊच नाही, तर आता काय चर्चा करणार. तुमच्यासाठी चर्चा असतील. आमच्या भावना आहेत. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. पॉलिसीवर चर्चा करणारच. अनेक बिल येताहेत. प्रत्येकाच्या मतदारसंघात समस्या आहेत, असे सुळे यांनी सांगितलं.

‘आमचा पक्ष लोकांसाठी आहे. पॉलिसी मेकिंगवर आहे. यावर आमची खासदारांसोबत चर्चा होते. आम्ही वेगवेगळ्या कमिटीत आहे. कोणाला थांबा हवा असतो. सगळ्यांनी मग अमोल कोल्हे यांना सांगायचं. कारण ते त्या कमिटीत आहे. निलेश लंके यांच्या मतदारसंघात नवा मार्ग होत होता. तो त्यांना मान्य नव्हता. तेथील स्थानिकांचा विरोध होता. अमोल कोल्हे यांना विनंती केली. त्यानंतर कोल्हे यांनी लंके यांना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे नेलं. आमच्या खासदारांची कामगिरी पाहा. नातं आणि राजकारणात गल्लत करू नका. छगन भुजबळ हे 80 वर्षांचे आहेत. तटकरे हे 40-50 वर्षात राजकारणात आहेत. त्यांच्या अनुभव आणि वयाने लहान आहे. आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या व्यक्तींवर बोलू नये, असे घरचे संस्कार आहेत. माझा 20 वर्षांतील इतिहास काढून पाहा. माझ्यापेक्षा वयाने मोठे किंवा लहान असो, मी सन्मानाने बोलण्याचे संस्कार आहेत. चांगल्या वाईट काळात एकत्र राहिलो आहे.  सर्व नेते मंडळींशी संबंध आहेत. नाती माझ्याकडून कधी तुटत नाही. आयुष्यात सत्ता येते जाते. नाती टिकतात. ते बोलले, मी काय बोलणार. माझा 20 वर्षांचा अनुभव आहे. त्यांचा 40 वर्षांचा अनुभव आहे. माझ्या मनात अरुण जेटली, सुषमा स्वराज यांच्याविषयी पोटतिडीकीने बोलते. आता तुम्ही म्हणाल, भाजपचे कौतुक करताय. लोकप्रतिनिधी म्हणून जेटली, सुषमाजी ,चिदंबरम, मनमोहन सिंग यांचे भाषण बघून मोठे झाले. आम्ही सेवेसाठी आलो, असे सुप्रिया सुळे पुढे गेल्या.

Follow Us
भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना....
Supriya Sule On NCP Merger : भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना पूर्णविराम!
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; पटेल भेटीवर...
Supriya Sule On Praful Patel Meeting : अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; प्रफुल्ल पटेल भेटीवर सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
Supriya Sule On NCP Merger : विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण, राष्ट्रवादीच्या चर्चांना पूर्णविराम?
ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले
Aaditya Thackeray : ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; राऊत नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून शिंदेंचा
Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
Jensen Huang : CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
जळगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16..
Jalgaon : जळगाव जिल्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16 वाजता जमीन थरथरली; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम....
Pune : पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम चित्रपटाच्या शूटिंगवरून नवा वाद
करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली
Karuna Munde : करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळ यांची घेतली भेट; चर्चांना उधाण