AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या राज्यात ढोसली जाते सर्वाधिक दारू? महाराष्ट्र पेदाडांमध्ये कितवा? आकडा धक्कादायक

भारतातील दारूच्या सेवनाचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. महाराष्ट्र दारू पिणाऱ्या राज्यांमध्ये पाचव्या स्थानी आहे, तर कर्नाटक आघाडीवर आहे. दक्षिण भारतातील राज्ये दारूच्या विक्रीत मोठी भूमिका बजावत आहेत. विशेष म्हणजे, तरुण वयातील लोक अधिक दारू पित असून, त्यांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

कोणत्या राज्यात ढोसली जाते सर्वाधिक दारू? महाराष्ट्र पेदाडांमध्ये कितवा? आकडा धक्कादायक
alcohol consumption IndiaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2026 | 12:02 PM
Share

भारतात प्रचंड प्रमाणात दारू प्यायली जाते. भारतात किती दारू ढोसली जाते याचा एक रिपोर्ट आला आहे. त्यातील आकडे पाहिल्यावर सर्वांनाच धक्का बसेल. सर्वाधिक दारू पिणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आहे. मात्र, या लिस्टमध्ये दक्षिण भारतातील राज्य अधिक प्रमाणात आहेत. या आकडेवारीनुसार, देशात कर्नाटकात सर्वाधिक दार प्यायली आणि विकली जाते. कर्नाटकात वर्षाला 6.9 कोटी दारूचे डब्बे (केस) विकले जात आहेत. या यादीत दक्षिण भारतातील चार राज्यांचा समावेश आहे.

तेलंगणात पुरुषांचा झिंगाट

दक्षिण भारतात तेलंगणामध्ये 40 टक्के पुरुष दारू पितात. देशातील हा सर्वात मोठा आकडा आहे. कर्नाटकात वर्षाला 6.9 कोटी डब्बे दारू विकली जाते. या यादीत कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे. तामिळनाडूत 6.4 कोटी डब्ब्यांची विक्री होते. तेलंगणामध्ये 3.7 कोटी डब्बे आणि आंध्रप्रदेशात 3.5 कोटी डब्बे विकले जातात. या यादीत तेलंगणा आणि आंध्रप्रदेश अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. तर महाराष्ट्र या यादीत पाचव्या स्थानी असून राज्यात 2.7 कोटी डब्बे विकले जात आहेत.

तामिळनाडू राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या TASMAC या वितरण नेटवर्कच्या माध्यमातून वर्षाला 6.4 कोटी बॉक्सची विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. इतर राज्यांच्या तुलनेत तेलंगणात सर्वाधिक पुरुष दारू पित असल्याचं समोर आलं आहे. राज्यात 40 टक्के पुरुष दारू पित असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र पाचवा

या यादीत महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात वर्षाला 2.7 कोटी दारूच्या बॉक्सची विक्री होते.

सर्वाधिक आजार तरुणांना

दरम्यान, चार वर्षापूर्वी सर्वाधिक दारु पिणाऱ्या व्यक्तींचा एक सर्व्हे आला होता. कोणत्या वयोगटातील लोक सर्वाधिक दारू पितात हे या सर्व्हेतून स्पष्ट झालं होतं. या सर्व्हेच्या निष्कर्षानुसार बुजुर्गांच्या तुलनेत तरुण लोक अधिक दारू पित असल्याचं उघड झालं होतं. धक्कादायक म्हणजे, तरुणांनाच दारू प्यायल्याने आरोग्याच्या समस्या अधिक असल्याचंही स्पष्ट झालं होतं. काही प्रमाणात दारू सेवन केल्याने काही आजारांची जोखीम कमी होऊ शकते. पण इतर अनेक आजार उद्भवण्याचा धोका सर्वाधिक असतो.

2020मध्ये जगात जवळपास 1.34 बिलियन लोकांनी दारू प्यायल्याचं समोर आलं आहे. ज्या लोकांनी सर्वाधिक मद्य घेतलं त्याचं वय 15 ते 39 वर्षाच्या दरम्यान असल्याचंही या संशोधनातून पुढे आलं आहे. या तरुणांना दारू प्यायल्याने जीवघेणे आजार झाल्याचंही स्पष्ट झाल्याचं ग्लोबल बर्डन ऑफ डीजिज स्टडी 2020च्या विश्लेषणातून समोर आलं आहे.

Follow Us
भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना....
Supriya Sule On NCP Merger : भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना पूर्णविराम!
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; पटेल भेटीवर...
Supriya Sule On Praful Patel Meeting : अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; प्रफुल्ल पटेल भेटीवर सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
Supriya Sule On NCP Merger : विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण, राष्ट्रवादीच्या चर्चांना पूर्णविराम?
ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले
Aaditya Thackeray : ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; राऊत नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून शिंदेंचा
Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
Jensen Huang : CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
जळगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16..
Jalgaon : जळगाव जिल्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16 वाजता जमीन थरथरली; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम....
Pune : पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम चित्रपटाच्या शूटिंगवरून नवा वाद
करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली
Karuna Munde : करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळ यांची घेतली भेट; चर्चांना उधाण