AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपघातानंतर अंथरुणाला खिळलेला हिरो; खोल पाण्यात बुडताना करिश्मा कपूरने वाचवले होते प्राण

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पहिला हिरो तुम्हाला आठवतोय का? 'प्रेम कैदी'च्या यशानंतर या अभिनेत्याची तरुणींमध्ये तुफान क्रेझ होती. अनेकांनी त्याला रक्ताने प्रेमपत्रं लिहिली होती. मात्र एका अपघातानंतर त्याचं आयुष्यच बदलून गेलं.

अपघातानंतर अंथरुणाला खिळलेला हिरो; खोल पाण्यात बुडताना करिश्मा कपूरने वाचवले होते प्राण
करिश्मा कपूर आणि हरिश कुमारImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 14, 2026 | 11:54 AM
Share

नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यापैकी काही कलाकार अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झाले, तर काहींचं करिअर अचानक थांबलं. असाच एक अभिनेता म्हणजे हरीश कुमार. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून त्याने अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तो करिश्माचा पहिला हिरो होता. एकेकाळी त्याची लोकप्रियता इतकी होती की, तब्बल 15 मुलींनी त्याला रक्ताने पत्रं लिहिली होती. मात्र, एका गंभीर दुखापतीमुळे त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. विशेष म्हणजे, हरीशला कधीच अभिनेता व्हायचं नव्हतं. त्याचा अभिनय क्षेत्रातील प्रवासही अनेक अनपेक्षित वळणांनी भरलेला आहे.

कधीच अभिनेता व्हायचं नव्हतं

हरीश कुमारचा जन्म 1 ऑगस्ट 1975 रोजी हैदराबादमध्ये झाला. लहानपणापासूनच त्याचा कल अभिनयाकडे नव्हता. त्याला चित्रपटसृष्टीत येण्याची विशेष इच्छा नव्हती. मात्र, घरातील आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित परिस्थितीमुळे त्याला लहान वयातच कॅमेऱ्यासमोर उभं राहावं लागलं. बालकलाकार म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करत त्याने स्वतःची ओळख निर्माण केली. त्याला अभिनयापेक्षा शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचं होतं, पण नशिबाने त्याच्यासाठी वेगळीच वाट निवडली होती.

हिंदी चित्रपटसृष्टीत ज्युनिअर रजनीकांत म्हणून पदार्पण

हरीश कुमारने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तेव्हा त्याला ज्युनिअर रजनीकांत म्हणून ओळख मिळाली होती. त्याच्या अभिनयातील शैली आणि व्यक्तिमत्त्वामुळे त्याची ही ओळख निर्माण झाली. दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर त्याने हिंदी चित्रपटांकडे मोर्चा वळवला. 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून त्याला मोठी संधी मिळाली. या चित्रपटात करिश्मा कपूर त्याची नायिका होती. करिश्माचा हा पहिलाच चित्रपट असल्याने दोघांची जोडी विशेष चर्चेत आली.

शिक्षणापेक्षा चित्रपटांना द्यावं लागलं प्राधान्य

हरीशने वयाच्या 13 व्या वर्षी मल्याळम चित्रपट ‘डेझी’मधून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं. हा चित्रपट केरळमध्ये प्रचंड गाजला. मात्र, यश मिळवण्याच्या नादात त्याचं बालपण आणि शिक्षण मागे पडलं. शाळेत जाण्यासाठी एकीकडे बस उभी असायची, तर दुसरीकडे शूटिंगसाठी गाडी आलेली असायची. अशावेळी नेमकं कुठे जायचं, हा प्रश्न त्याच्यासमोर असायचा. त्याचे वडील त्याला शूटिंगला जाण्याचा सल्ला द्यायचे. कारण अशी संधी पुन्हा मिळणार नाही, असं त्यांना वाटायचं. विशेष म्हणजे, परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधी ‘डेझी’ चित्रपटाची ऑफर आली होती. हरीशने परीक्षा देण्याऐवजी चित्रपट स्वीकारला. अशाप्रकारे त्याला अभिनयासाठी शिक्षणाचा त्याग करावा लागला.

15 मुलींनी रक्ताने लिहिली होती प्रेमपत्रं!

‘प्रेम कैदी’च्या यशानंतर हरीश कुमार तरुणींमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे. त्याच्या घरी चाहत्यांची पत्रं अक्षरशः येत असत. विशेष म्हणजे, काही मुलींनी त्याला चक्क स्वतःच्या रक्ताने प्रेमपत्रं लिहिली होती. हरीशने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. त्याची बहीण ही पत्रं आवडीने वाचायची. काही मुली तर आपल्या वडिलांसोबत त्याच्या घरी लग्नाची मागणी घेऊन यायच्या. आमची मुलगी तुमच्यासाठी वेडी झाली आहे, असं त्यांचे वडील सांगायचे. काही चाहत्यांनी त्याला महागड्या भेटवस्तू आणि पैसेही देऊ केले होते. आजही रक्ताने लिहिलेली ती पत्रं आपल्याकडे असल्याचं हरीशने सांगितलं होतं.

पाठीच्या दुखापतीमुळे आयुष्य बदललं; दोन वर्षे अंथरुणाला खिळला

एकेकाळी चित्रपटांच्या ऑफर्सची रांग लागलेला हरीश 2001-02 च्या सुमारास अचानक मोठ्या पडद्यावरून गायब झाला. त्यामागे कामाची कमतरता नव्हती, तर गंभीर शारीरिक दुखापत होती. त्याला पाठीच्या कण्याशी संबंधित गंभीर स्लिप डिस्कचा त्रास झाला होता. L3 आणि L5 मणक्यांमध्ये समस्या निर्माण झाली होती. परिस्थिती इतकी गंभीर होती की, त्याला साधं स्वच्छतागृहात जाणंही शक्य होत नव्हतं. जवळपास दोन वर्षे तो अंथरुणाला खिळून होता. शस्त्रक्रिया करण्याचीही त्याची इच्छा नव्हती. या दुखापतीमुळे त्याला अभिनयक्षेत्रापासून दूर व्हावं लागलं.

दरम्यान, हरीशने ‘नॉटी @ 40’, ‘चार दिन की चांदनी’ आणि ‘आ गया हिरो’ यांसारख्या चित्रपटांतून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पूर्वीसारखं यश मिळालं नाही. आता त्याला अभिनेता म्हणून नव्हे, तर दिग्दर्शक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे.

Follow Us
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; पटेल भेटीवर...
Supriya Sule On Praful Patel Meeting : अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; प्रफुल्ल पटेल भेटीवर सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
Supriya Sule On NCP Merger : विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण, राष्ट्रवादीच्या चर्चांना पूर्णविराम?
ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले
Aaditya Thackeray : ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; राऊत नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून शिंदेंचा
Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
Jensen Huang : CEO जेन्सन हुआंग यांच्यावर चिनी महिलेचा हनी ट्रॅप? नेमकं प्रकरण काय?
जळगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16..
Jalgaon : जळगाव जिल्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, मुक्ताईनगर-रावेरमध्ये सकाळी 9.16 वाजता जमीन थरथरली; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम....
Pune : पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम चित्रपटाच्या शूटिंगवरून नवा वाद
करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली
Karuna Munde : करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळ यांची घेतली भेट; चर्चांना उधाण
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं?
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं? मुंबई महापालिकेतील बैठकीवरून नवा राजकीय वाद