IAS-IPS अधिकारी प्रेमात पडले; आता होणार शाही विवाह, कशी आहे विवेक आणि अदिती यांची लव्हस्टोरी?
Ias ips love story : सध्या आयपीएस जोडप्याचं लग्न सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. दोघे उद्या म्हणजे १५ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांना एकच केडरही मिळाले आहे.

हरियाणा केडरचे आयएएस अधिकारी विवेक आर्य आणि उत्तर प्रदेशातील आयपीएस अघिकारी अदिती सिंग यांचा विवाह सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. दोघेही रविवारी १५ नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. या दोघांचा विवाहसोहळा हरियाणातल्या पंचकुलामध्ये पार पडेल. विवेक हे अतिरिक्त पोलिस उपआयुक्त तर अदिती सिंग या पोलिस उपआयुक्त आहेत. या दोघांची प्रेमकहाणी सध्याही ट्रेंडमध्ये आली आहे. दोन अधिकारी एकमेकांच्या प्रेमात कधी पडले त्यांनी लग्नाच्या निर्णयापर्यंतचा प्रवास कसा केला, याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे. चला तर मग जाणून घेऊयात त्यांची लव्हस्टोरी.
विवेक आर्य यांचा अधिकारी बनण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी सरकारी शाळेत शिक्षण घेतलेलं आहे. त्याशिवाय त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण कुंजपुरा येथील सैनिक स्कूलमधून घेतले. चंदीगढमध्ये त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं आणि यूपीएससीमध्ये १३१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन अधिकारी झाले.
भेट कुठे झाली, प्रेम कसे झाले?
दरम्यान, अदितींशी विवेक यांची भेट मसुरीमध्ये झाली. मसुरीतल्या लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये त्या प्रशिक्षण घेत होत्या. याचवेळी दोघांमध्ये मैत्रीपूर्ण नाते तयार झाले. त्यानंतर इथेच त्यांत्यामध्ये प्रेम झालं. अदिती सिंह यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास त्या मूळच्या उत्तर प्रदेशमधील मेरठच्या आहेत. पण सध्या त्या हिमाचल प्रदेश केडरमधील आयपीएस अधिकारी आहे.
दोघंही सध्या पंचकुलामध्ये कार्यरत असून उद्या ते विवाहबद्ध होणार आहेत. दरम्यान, काल संध्याकाळी भादरा येथे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आलेला. यावेळी अनेक राजकीय नेते, आयपीएस अधिकारी आणि एचसीएस अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.
२०२०मध्ये अदिती यांनी यूपीएससी परिक्षेमध्ये ५४ वा रँक मिळवलेला. त्यांची आधी एसडीएम म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी भारतीय पोलिस सेवेत जाण्याचा निर्णय घेता. सुरुवातीला हिमाचल प्रदेश केडर दिले होते. पण आता त्यांच्या विवेक आर्य यांच्याशी लग्नाच्या निर्णयानंतर त्यांनी हरियाणा केडर देण्यात आले आहे. या लग्नालाही कोण कोण उपस्थित राहतं याबद्दल उत्सुकता आहे.
