मुंबईत पंचतारांकित हॉटेलचे रुग्णालयात रुपांतर, एका दिवसाचे शुल्क किती?

मुंबईत आता कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी पंचतारांकित हॉटेलचा वापर केला जाणार आहे. (Mumbai Five Star Hotels for Covid Treatment)

मुंबईत पंचतारांकित हॉटेलचे रुग्णालयात रुपांतर, एका दिवसाचे शुल्क किती?
Mumbai Corona
Namrata Patil

|

Apr 15, 2021 | 11:08 AM

मुंबई : राज्यातील कोरोना स्थिती विदारक होत चालली आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईतील कोरोना संख्या नियंत्रणात यावी, यासाठी पालिकेकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहे. मुंबईत आता कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी पंचतारांकित हॉटेलचा वापर केला जाणार आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येत घट होण्यास मदत होणार आहे. मुंबई महापालिकेने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. (Mumbai Five Star Hotels for Covid Treatment)

कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी पंचतारांकित हॉटेलचा वापर 

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांच्या उपचारासाठी आता पंचतारांकित हॉटेलचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता खासगी रुग्णालय रुग्णांच्या उपचारासाठी 4 किंवा 5 स्टार हॉटेलचा वापर करणार आहे. यामुळे ज्या रुग्णांना बेडची सर्वाधिक गरज आहे, त्यांना बेड उपलब्ध होईल.

तसेच ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षण नाहीत, त्यांना या हॉटेलमध्ये पाठवण्यात येईल. त्यांच्यावर याच हॉटेलमध्ये उपचार केले जातील. याबाबत लवकरच खासगी रुग्णालय हॉटेलसोबत करार करणार आहे.  या सगळ्या कामांवर देरखेख ठेवण्यासाठी मुंबईच्या 24 वॉर्डांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

आयसीयु बेडची गरज नसणारे रुग्ण हॉटेल्समध्ये हलवले जाणार 

मुंबईत कोरोना बेडसचा प्रश्न सोडवण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याचे बोललं जात आहे. मुंबईतील बेडची कमतरता सोडवण्यासाठी खासगी हॉटेल्समधील बेडही कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवले जाणार आहे. खाजगी रुग्णालयांसोबत फोर-फाईव्ह स्टार हॉटेल्सचा टायअप करण्यात येणार आहे. यात रिकव्हर होत असणारे आणि आयसीयु बेडची गरज नसणारे रुग्ण हॉटेल्समध्ये हलवले जाणार आहेत.  अशा रुग्णांना हॉटेलमधील उपचारासाठी स्टेप डाऊन फॅसिलीटी दिली जाणार आहे.

मुंबईत कोणकोणत्या हॉटेलचे रुग्णालयात रुपांतर?

  1. बॉम्बे हॉस्पिटलमधील रुग्णांच्या स्टेप डाऊन फॅसिलीटीसाठी मरिन ड्राईव्ह येथील InterContinental हॉटेल बुक करण्यात आले आहे
  2. तर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलसाठी बिकेसी येथील ट्रायडेंट हॉटेल बुक करण्यात आले आहेत
  3. स्टेप डाऊन फॅसिलीटी दिलेल्या हॉटेल्समध्ये जर पेशंटसोबत एका नातेवाईकासही राहायचे असेल तर त्यांना ट्विन रुम बुक करुन दिल्या जातील
  4. स्टेप डाऊन फॅसिलीटीच्या रुग्णांसाठी दर दिवसाला 4000 रुपयापर्यंतचे शुल्क आकारले जाईल
  5. तसेच ट्विन रुम फॅसिलीटीसाठी 6000 रुपये आकारले जातील
  6. ज्या हॉटेल्समध्ये किमान 20 खोल्या असतील, तेच हॉटेल स्टेप डाऊन फॅसिलीटी म्हणून खाजगी हॉस्पिटल वापरु शकेल
  7. हॉटेलमधील डॉक्टरांची वेळोवेळी भेट, इतर औषधे आणि वैद्यकिय गरज पुरवणे ही हॉस्पिटलची जबाबदारी असेल

मुंबईतील कोरोना स्थिती –

मुंबईत काल दिवसभरात 9 हजार 925 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या 24 तासांत 9 हजार 276 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मुंबईतील मृतांची संख्या दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. काल दिवसभरात मुंबईत 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत सध्या 87 हजार 443 सक्रीय रुग्ण आहेत.

नव्या आकडेवारीसह मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 40 दिवसांवर येऊन ठेपलाय. 7 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान मुंबईतील कोविड वाढीचा दर 1.71 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यातील कोरोना स्थिती काय?

काल दिवसभरात 58 हजार 952 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 278 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या 24 तासांत 39 हजार 624 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कालच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 35 लाख 78 हजार 160 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 29 लाख 5 हजार 721 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 58 हजार 804 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 6 लाख 12 हजार 70 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. (Mumbai Five Star Hotels for Covid Treatment)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update : चिंता कायम; राज्यात दिवसभरात 58 हजार 952 नवे कोरोना रुग्ण, 278 जणांचा मृत्यू

Mumbai Lockdown | कुठे मजुरांची गर्दी, तर कुठे रस्त्यांवर शांतता, मुंबईतील लॉकडाऊनचा पहिला दिवस

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें