AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Jadhav | पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका; संजय जाधव यांचा सरकारवर हल्लाबोल

Sanjay Jadhav | पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका; संजय जाधव यांचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Feb 23, 2026 | 4:23 PM
Share

परभणी जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला जोरदार विरोध होत असून शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. महामार्गाचा कोणताही फायदा होणार नसल्याचा दावा करत आम्ही आमच्या जमिनी देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. परभणी-गंगाखेड महामार्गावरील शिंगणापूर पाटी येथे शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सलग तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.

परभणी जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला जोरदार विरोध होत असून शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. महामार्गाचा कोणताही फायदा होणार नसल्याचा दावा करत आम्ही आमच्या जमिनी देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. परभणी-गंगाखेड महामार्गावरील शिंगणापूर पाटी येथे शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सलग तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. सकाळपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. जमीन मोजणीदरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन अधिक तीव्र केले. या आंदोलनात परभणी जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते सहभागी झाले. ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनीही आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला. माध्यमांशी संवाद साधताना संजय जाधव यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. “शक्तिपीठ महामार्गासाठी घेतल्या जाणाऱ्या जमिनी शेतकऱ्यांच्या संमतीने घ्याव्यात, ही आमची भूमिका आहे. या जमिनी आमच्या उपजीविकेचे साधन आहेत. तरीही सरकार जबरदस्तीने जमिनी विकण्याचा दबाव टाकत आहे,” असे जाधव यांनी म्हटले.
जमीन मोजणीच्या नावाखाली अमानुष वर्तन झाल्याचा आरोप करत त्यांनी महिलांशी गैरवर्तन झाल्याचा मुद्दाही उपस्थित केला. “ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला लाज वाटावी अशी आहे,” असे ते म्हणाले. तसेच, भाजप सरकार केवळ स्वतःचे राजकीय हित साधत असल्याचा आरोप करत त्यांनी उद्योगपतींना पोसण्यासाठीच हे धोरण राबवले जात असल्याचे म्हटले. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, हि एकमेव भूमिका ह्या भाजपची देशात चालू आहे असा आरोप जाधव यांनी भाजपवर केला आहे.

Published on: Feb 23, 2026 04:23 PM

Follow Us
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’.

‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या...

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या..

CJP Protest Delhi LIVE : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक ठाम.

CJP Protest Delhi LIVE : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक ठाम

माझ्या खोलीत आली, संमतीशिवायच तिने केलं किस.. प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; 2पानी चिठ्ठीत...

माझ्या खोलीत आली, संमतीशिवायच तिने केलं किस.. प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; 2पानी चिठ्ठीत..