AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळलं, उड्डाण घेताच संपर्क तुटला, अन्…

Ranchi Plane Crash : रांची येथे टेकऑफनंतर काही वेळातच एका एअर अॅम्ब्युलन्सचा अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर या विमानाचा संपर्क तुटला आणि काही वेळातच हे विमान कोसळते. ही एअर अॅम्ब्युलन्स एका रुग्णाला दिल्लीला घेऊन जात होती.

मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळलं, उड्डाण घेताच संपर्क तुटला, अन्...
Ranchi Plane CrashImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 23, 2026 | 11:20 PM
Share

झारखंडमधून मोठी बातमी समोर येत आहे. रांची येथे एक मोठा विमान अपघात झाला आहे. टेकऑफनंतर काही वेळातच एका एअर अॅम्ब्युलन्सचा अपघात झाला. हे विमान दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. मात्र उड्डाण केल्यानंतर या विमानाचा संपर्क तुटला आणि काही वेळातच हे विमान कोसळते. ही एअर अॅम्ब्युलन्स एका रुग्णाला दिल्लीला घेऊन जात होती. चतरा आणि सिमरियाच्या सीमेवर विमान कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या विमानात एकूण 7 जण प्रवास करत होते अशीही माहिती समोर आली आहे.याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

7 प्रवासी असलेले विमान कोसळले

समोर आलेल्या माहितीनुसार रांची आणि परिसरात पाऊस पडत आहे. त्यामुळे हे विमान कोसळले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या विमानात रुग्णाव्यतिरिक्त एक डॉक्टर, एक पॅरामेडिक, दोन अटेंडंट, एक पायलट-इन-कमांड आणि एक सह-पायलट असे 7 जण होते. चतरा जिल्ह्यातील सिमरिया पोलिस स्टेशन परिसरातील कासारी पंचायतमधील पथलपानिया येथे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत जीवितहानी झाली की नाही याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही.

अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

रांची विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या एअर अॅम्ब्युलन्सने रांचीहून सायंकाळी 7:11 वाजता उड्डाण केले. त्यानंतर विमानाशी अखेरचा संपर्क 7:34 च्या दरम्यान झाला. त्यानंतर कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर हे विमान कोसळले आहे. विमानतळ संचालकांनी या अपघाताची पुष्टी केली आहे. आता स्थानिक प्रशासन आणि पोलिस पथके सध्या जंगलात बचाव कार्यात गुंतलेली आहेत. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खराब हवामानामुळे विमान कोसळले असल्याची शक्यता

विमानाचे शेवटचे स्थान लातेहार आणि पलामू दरम्यानच्या घनदाट जंगली आणि डोंगराळ भागात असल्याची माहिती समो वृत्त आहे. तसेच या भागातील हवामान अचानक बिघडले असल्याची माहिती समोर आली आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे होते. कमी दृश्यमानता किंवा तांत्रिक बिघाडामुळे विमान भरकटले असावे किंवा कोसळले असावे असा संशय आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा