AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग

5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग

| Updated on: Jul 10, 2026 | 2:00 PM
Share

नाशिकच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे 10 ते 12 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चांमुळे नाशिक महापालिकेतील सत्तासमीकरणांबाबत नव्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अलीकडेच बैठका झाल्या असून, संभाव्य पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, संबंधित नगरसेवकांना प्रभागनिहाय विकासकामांसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांच्या विशेष निधीचे आमिष दाखवण्यात आल्याचीही चर्चा सुरू आहे. तसेच ठाकरे गटातील एका वरिष्ठ नेत्याच्याही संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनी राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

शिंदे गटाकडून संघटन विस्तारासाठी हालचालींना वेग आल्याचेही बोलले जात असून, नाशिक महापालिकेच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, या सर्व घडामोडींवर संबंधित पक्षांकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नसून, पक्षांतराच्या चर्चांमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता आणि चर्चांना मोठे उधाण आले आहे.

Published on: Jul 10, 2026 02:00 PM

Follow Us