AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाई तुमच्यावर देवीचा कोप झालाय, फक्त तेवढं करा… भोंदू ज्योतिषाने थेट महिलेला… नागपूरमध्ये सनसनाटी

नागपूरमध्ये एका महिलेची भोंदू ज्योतिषांनी 'देवीच्या कोपाची' भीती दाखवून फसवणूक केली आहे. रुग्णालयातून परतताना तिला गाठून, सोन्याचे दागिने व मोबाईल लंपास केले. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेने अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बाई तुमच्यावर देवीचा कोप झालाय, फक्त तेवढं करा... भोंदू ज्योतिषाने थेट महिलेला... नागपूरमध्ये सनसनाटी
Bhondu baba LootImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 10, 2026 | 11:22 PM
Share

भोंदू लिंगपिसाट खरातचं प्रकरण उघडं झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. त्यानिमित्ताने भोंदूगिरीवर बरंच लिहिलं गेलं. बोललं गेलं. असंख्य बातम्या झाल्या. पण लोक या भोंदूगिरीतून काही बाहेर पडताना दिसत नाहीये. आजही लोक भोंदूबाबांच्या नादी लागताना दिसत आहेत. नागपूरमध्ये एक महिला भोंदूबाबाच्या नांदी लागली आणि आयुष्यभराची कमाई गमावून बसली. या सनसनाटी घटनेने नागपूरकर हादरून गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भोंदूगिरी आणि त्यांच्या नादी लागणाऱ्या अंधश्रद्धाळूंचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नागपुरात देवीच्या कोपाची भीती दाखवत भोंदू ज्योतिषांनी एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक केली. या महिलेचे सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून भोंदू ज्योतिषावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

रुग्णालयातून बाहेर पडल्या अन्…

नागपूरच्या इमामवाडापोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेडिकल चौकाजवळ, व्हीआर मॉल शेजारी रामबागकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. सुजाता भगवानलाल अगरवाल या रुग्णालयातून मुलीच्या घरी जात असताना स्वतःला ज्योतिष असल्याचे सांगणाऱ्या दोन भामट्यांनी त्यांना गाठले. तुमच्यावर देवीचा कोप झाला असून त्यामुळेच तुमची आई आजारपणामुळे अंथरुणाला खिळली आहे, अशी भीती त्यांनी सुजाता यांना दाखवली. तसेच हा प्रकोप दूर करायचा असेल तर हातातील सोन्याच्या बांगड्या आणि गळ्यातील सोनसाखळी पिशवीत ठेवण्यास सांगितले.

50 पावलं मागे चला, पण…

आईच्या आजारपणाची माहिती कशी मिळाली? असा प्रश्न सुजाता अगरवाल यांच्या मनात आला. या ज्योतिषांकडे दैवी शक्ती असल्याचं त्यांना वाटलं. त्यामुळे सुजाता अगरवाल यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. सुजाता यांनी सुमारे चार तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या आणि गळ्यातील सोनसाखळी, मोबाइल काढून पिशवीत ठेवली. यानंतर आरोपींनी त्यांना डोळे बंद करून 50 पावले मागे चालत जाण्यास सांगितले आणि मागे वळून पाहू नका, अशी ताकीद दिली. याच दरम्यान आरोपींनी पिशवीची अदलाबदल करून सोन्याचे दागिने घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला