Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा… म्हणत जनसागर रस्त्यावर
बीड जिल्ह्यातील केज शहरात विलास घुले हत्या प्रकरणाला घेऊन आज नागरिकांनी मोठा मोर्चा काढत आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले असून, शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
बीड जिल्ह्यातील केज शहरात विलास घुले हत्या प्रकरणाला घेऊन आज नागरिकांनी मोठा मोर्चा काढत आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले असून, शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास घुले हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरव सोनवणे याला तातडीने अटक करण्यात यावी, तसेच त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली.
मोर्चादरम्यान नागरिकांनी रस्त्यावर उतरून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशा घोषणा दिल्या. या प्रकरणात न्याय मिळावा आणि दोषींवर तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही आंदोलकांनी प्रशासनाकडे केली.
दरम्यान, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पुढील कारवाईकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 10, 2026 02:30 PM
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...

