AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर

Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर

| Updated on: Jul 10, 2026 | 3:29 PM
Share

पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान अनेक वारकऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला असून, यामुळे वारकरी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी वारकऱ्यांच्या अंगावर खाज येणारी पावडर टाकून त्यांचे लक्ष विचलित केले. त्यानंतर काहींच्या तोंडाला साबण फासून गोंधळ निर्माण करत त्यांच्या जवळील मोबाईल फोन आणि रोख रक्कम लंपास केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेतील एका वारकऱ्याने आपला मोबाईल आणि सुमारे पाच हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा दावा केला. घडलेल्या प्रकारामुळे संबंधित वारकरी भावुक झाले असून, मोबाईल हरवल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाल्याचेही पाहायला मिळाले.

दरम्यान, पालखी सोहळ्यासाठी लाखो भाविक पुण्यात दाखल झाले असून, गर्दीचा फायदा घेत चोरटे सक्रिय झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, संबंधित घटनांचा तपास सुरू आहे. तसेच वारकऱ्यांनी गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.   tv9marathinews

Published on: Jul 10, 2026 03:29 PM

Follow Us