Roha Accident | खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू
रायगड जिल्ह्यातील रोहा येथील रेल्वे उड्डाण पुलावरील खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस पाटलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

मिळालेल्या माहितीनुसार, भातसई गावचे पोलीस पाटील संकेत कोतवाल यांचा उड्डाण पुलावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर नागरिकांनी पुलाच्या दुरवस्थेबाबत संताप व्यक्त करत संबंधित यंत्रणेविरोधात घोषणाबाजी केली.
गावकऱ्यांचा आरोप आहे की, उड्डाण पुलावरील मोठमोठे खड्डे आणि निकृष्ट देखभालीमुळे वारंवार अपघात घडत असून, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या घटनेनंतर पुलाची तातडीने दुरुस्ती करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे रोहा परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, उड्डाण पुलावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Published on: Jul 10, 2026 12:52 PM
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...