AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

Nashik | कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

| Updated on: Feb 23, 2026 | 4:52 PM
Share

कांदा आणि मक्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे कांदा व मका उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणापूर्वी शेतकऱ्यांनी बाजार समिती परिसरात एकत्र येत मोठे आंदोलन उभारण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र जमले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

कांदा आणि मक्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे कांदा व मका उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणापूर्वी शेतकऱ्यांनी बाजार समिती परिसरात एकत्र येत मोठे आंदोलन उभारण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र जमले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात कांदा आणि मक्याला योग्य दर मिळाला नसल्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कांद्याला हमीभाव मिळावा, मक्याचे घसरलेले दर पूर्ववत करावेत तसेच मक्याची शासकीय खरेदी अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने ती तातडीने वाढवावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, शासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल न घेतल्यास भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करून विविध मार्गांनी सुरू ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Published on: Feb 23, 2026 04:52 PM

Follow Us
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?.

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?