Maharashtra Corona Update : चिंता कायम; राज्यात दिवसभरात 58 हजार 952 नवे कोरोना रुग्ण, 278 जणांचा मृत्यू

आज दिवसभरात 58 हजार 952 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 278 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:22 PM, 14 Apr 2021
Maharashtra Corona Update : चिंता कायम; राज्यात दिवसभरात 58 हजार 952 नवे कोरोना रुग्ण, 278 जणांचा मृत्यू
कोरोना चाचणी प्रातिनिधिक फोटो

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. महाराष्ट्रात पुढील 15 दिवस संचारबंदी आदेश लागू राहणार आहे. अशावेळी राज्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, आज दिवसभरात 58 हजार 952 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 278 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या 24 तासांत 39 हजार 624 जण कोरोनामुक्त झाले आहेत. (Corona outbreak continues in Maharashtra, 58 thousand 952 new patients in a day)

आजच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 35 लाख 78 हजार 160 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 29 लाख 5 हजार 721 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 58 हजार 804 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 6 लाख 12 हजार 70 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती –

मुंबईत आज दिवसभरात 9 हजार 925 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या 24 तासांत 9 हजार 276 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मुंबईतील मृतांची संख्या दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. आज दिवसभरात मुंबईत 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत सध्या 87 हजार 443 सक्रीय रुग्ण आहेत.

नव्या आकडेवारीसह मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 40 दिवसांवर येऊन ठेपलाय. 7 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान मुंबईतील कोविड वाढीचा दर 1.71 टक्क्यांवर पोहोचला आहे.

पुण्यातील कोरोना स्थिती –

पुणे शहरात आज दिवसभरात 4 हजार 206 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 895 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. पुण्यात आज 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 53 हजार 326 सक्रीय रुग्ण आहेत. त्यातील 1 हजार 158 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

आजच्या आकडेवारीसह पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 44 हजार 29 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 84 हजार 801 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 902 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नागपुरातील कोरोना स्थिती –

नागपुरात आज दिवसभरात 5 हजार 993 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 3 हजार 993 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासांत नागपुरात 57 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 97 हजार 36 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 28 हजार 71 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 960 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

Break The Chain Order Maharashtra: नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

Maharashtra Lockdown Sanchar Bandi : महाराष्ट्रात 15 दिवस संचारबंदी लागू, अंतिम नियमावली जरुर पाहा

Corona outbreak continues in Maharashtra, 58 thousand 952 new patients in a day