झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून स्थानिक निवडणुका घेण्यास कोर्टाचा नकार
जिल्हा परिषदांमधील आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याचे प्रकरण समोर आले असून या पार्श्वभूमीवर संबंधित निवडणुकांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून निवडणुका घेण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. अंतिम सुनावणी होईपर्यंत निवडणुका घेणे उचित ठरणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले आहे.
जिल्हा परिषदांमधील आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याचे प्रकरण समोर आले असून या पार्श्वभूमीवर संबंधित निवडणुकांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून निवडणुका घेण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. अंतिम सुनावणी होईपर्यंत निवडणुका घेणे उचित ठरणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले आहे. या संदर्भातील सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असून यासाठी दोन दिवस निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान, ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे, त्या ठिकाणच्या निवडणुकांना न्यायालयाने स्थगिती दिली आहे. परिणामी संबंधित जिल्हा परिषदांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी प्रलंबित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Published on: Feb 23, 2026 05:17 PM
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...

