स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी दम्याच्या रुग्णांनी ‘या’ टिप्स फाॅलो करा, वाचा सविस्तर!

| Updated on: Nov 07, 2021 | 9:17 AM

दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे हवा अत्यंत विषारी झाली आहे. त्यामुळे आकाशात धुके पसरले असून डोळ्यातून पाणी येणे, घसादुखी, डोकेदुखी अशा समस्यांमधून नागरिकांना जावे लागत आहे. परंतु ही स्थिती त्याहूनही घातक आहे.

स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी दम्याच्या रुग्णांनी या टिप्स फाॅलो करा, वाचा सविस्तर!
आरोग्य
Follow us on

मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे हवा अत्यंत विषारी झाली आहे. त्यामुळे आकाशात धुके पसरले असून डोळ्यातून पाणी येणे, घसादुखी, डोकेदुखी अशा समस्यांमधून नागरिकांना जावे लागत आहे. परंतु ही स्थिती त्याहूनही घातक आहे. अशा लोकांसाठी जे दमा किंवा श्वसनाच्या कोणत्याही आजाराचे रुग्ण आहेत.

तज्ज्ञांच्या मते, वायू प्रदूषण सर्वांसाठीच हानिकारक आहे. त्यामुळे निरोगी लोकही आजाराच्या विळख्यात पडतात कारण प्रदूषणामुळे विषारी हवा श्वासोच्छवासाद्वारे आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचते. परंतु दमा, क्षयरोग, न्यूमोनिया, आयएलडी किंवा इतर कोणत्याही श्वसनाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी प्रदूषित विषारी हवा धोकादायक ठरू शकते आणि त्यांची स्थिती गंभीर होऊ शकते.

तज्ज्ञांचे मत काय जाणून घ्या

श्‍वसन तज्ज्ञ डॉ. निष्ठा सिंह यांच्या मते, भारतात अस्थमाचा प्रसार झपाट्याने होत आहे. मुलांमध्येही ही समस्या झपाट्याने वाढत आहे. सध्या सुमारे 1.5 ते 20 दशलक्ष लोक या समस्येने त्रस्त आहेत. झपाट्याने वाढत जाणारे प्रदूषण हे त्याचे एक मोठे कारण आहे. दम्याच्या वेळी, एखाद्या व्यक्तीच्या वायुमार्गांना सूज येते आणि ज्यामुळे समस्या वाढण्यास सुरूवात होते. यामुळे श्वास घेण्यास खूप त्रास होतो.

ही लक्षणे दिसल्यास सावध व्हा

श्वासोच्छवासाचा त्रास, घरघर किंवा शिट्टीचा आवाज, छातीत घट्टपणा जाणवणे, अस्वस्थ वाटणे, खोकला, डोके जड होणे, थकवा जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात. जर तुमच्यासोबतही अशी समस्या होत असेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. याशिवाय दम्याच्या रुग्णांनी नेहमी सोबत इनहेलर ठेवावे जेणेकरुन अटॅक आल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवता येईल.

समस्या टाळण्यासाठी ही खबरदारी घ्या

प्रदूषणाच्या काळात घराबाहेर पडणे टाळा. गरज भासल्यास मास्क लावून बाहेर जा. हिवाळा सुरू झाला आहे, त्यामुळे शरीराला उबदार ठेवणारे कपडे घाला. तंबाखू, सिगारेट इत्यादी टाळा.  स्वयंपाकघरातील धुरापासून स्वतःचे संरक्षण करा. जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर घराबाहेर पडताना इनहेलर सोबत ठेवा. अधिक समस्या असल्यास तज्ञाचा सल्ला घ्या.

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

(Follow these tips for asthma patients to stay healthy)