Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

पण, जर एकदा काळपटपणा आला तर तो लवकर जात नाही.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:44 PM, 22 Jan 2021
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

मुंबई : सामान्यपणे आपण आपल्या चेहऱ्याकडे शरिरापेक्षा जास्त लक्ष देतो (Darkness Of Neck And Elbow). पण, मान आणि कोपराकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे मानेवर आणि कोपरावर काळपटपणा येते. गोऱ्या चेहऱ्यासोबत काळवंडलेली मान अतिशय वाईट दिसते. पण, जर एकदा काळपटपणा आला तर तो लवकर जात नाही. जर तुमच्यासोबतही अशी कुठली समस्या असेल, तर ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत (Darkness Of Neck And Elbow).

1- काळपटपणाची समस्या दूर करण्यात कच्चा बटाट फायदेशीर ठरतो. एका बाउलमध्ये कच्चा बटाटा किसून घ्या. त्यामध्ये दही मिसळा आणि मानेवर आणि कोपरावर लावा. 10 ते 15 मिनटं ते राहू द्या त्यानंतर पाण्याने धुवून घ्या.

2 – कोरफड जेल त्वचेच्या अनेक समस्यांवर फायद्याचं ठरते. काळपटपणा दूर करण्यासाठी एक कप गरम पाण्यात एक चम्मच कोरफड जेल मिसळा. त्यानंतर याला मानेवर, कोपरावर, गुडघ्यावर लावा. कापसाच्या मदतीने तुम्ही हे लावू शकता. 20 मिनटांनंतर कामट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

3- अर्ध्या लिंबाला कापून त्यामध्ये मीठ टाका आणि कोपर आणि मानेवर लावा. दहा मिनिटांनंतर ते ओल्या  कपड्याने स्वच्छ करुन घ्या. त्यानंतर अका बाऊलमध्ये खायचा एक चम्मच सोडा घ्या आणि पांढरं टूथपेस्ट त्यात मिसळा. ही पेस्ट मानेवर आणि कोपरावर लावा. सुखल्यानंतर धुवून घ्या. त्यानंतर मॉईश्चरायझर लावा.

4- मानेवरील आणि कोपरावरील काळपटपणा दूर करण्यासाटी लाल मसूरचा दाळ रात्री भिवजून घ्या. त्यानंतर सकाळी मिक्सरमधून बारिक करुन घ्या. त्यामध्ये कच्च दूध मिसळा आणि काळवंडलेल्या त्वचेवर लावा. 15 ते 20 मिनटांनंतर पाण्याने धुवून घ्या.

5- टोमॅटो मिक्सरमधून बारिक पेस्च करुन घ्या. कोपर आणि मानेवर लावा. 20 मिनटांनंतर धुवून घ्या. एका आठवड्यात तीनवेळा हे केल्याने काळपटपणा दूर होईल.

6- लिंबूमध्ये साखर मिसळा आणि काळवंडलेल्या त्वचेवर लावा. काही वेळाने कोमट पाण्याने धुवून घ्या. यामुळे काळपटपणा कमी होतो. साखरेच्या जागी मधाचाही वापर करु शकता.

Darkness Of Neck And Elbow

संबंधित बातम्या :

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

कांद्याच्या सालीला कचरा समजताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या…

Hair Care | केसांमध्ये कोंड्याची समस्या? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Papaya Leaf | आरोग्यवर्धक पपईच्या पानांचा रसही गुणकारी, वाचा याचे फायदे…