Hair Care | केसांमध्ये कोंड्याची समस्या? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

थंड वाऱ्यांमुळे आपली स्काल्प सुकते आणि केसांमध्ये खाज सुटणे सुरू होते. या हंगामात केसातील कोंड्याची समस्या सामान्य आहे.

Hair Care | केसांमध्ये कोंड्याची समस्या? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा!
कोंडा
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 5:49 PM

मुंबई : हिवाळ्यात आपले केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. या हवामानात थंड वाऱ्यांमुळे आपली स्काल्प सुकते आणि केसांमध्ये खाज सुटणे सुरू होते. या हंगामात केसातील कोंड्याची समस्या सामान्य आहे. कोंड्याच्या समस्येमुळे आपले केस तुटतात आणि विरळ होऊ लागतात. केसांतील कोंडा ही एक समस्या आहे, जी एकदा झाली की सहसा पटकन दूर होत नाही. बरेच लोक यावर अनेक उपाय सांगतात. मात्र, हे उपाय कधी कधी काम करत नाहीत (Home Remedies for dandruff problem).

केसांतील कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी, बाजारात मिळणारे अँटी-डँड्रफ शॅम्पू वापरू शकता. तसेच, या समस्येवर उपचार म्हणून अनेक प्रकारची केसांची उत्पादने बाजारात सध्या उपलब्ध आहेत. या गोष्टी करुनही कोंड्याची समस्या दूर होत नसेल तर, आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचार सांगणार आहोत. ज्याचा उपयोग करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय :

– मेथी दाणे एक पूर्ण दिवस पाण्यात भिजवत ठेवा. दुसर्‍या दिवशी पेस्ट तयार करुन त्यामध्ये दही मिसळा. हा उपाय डँड्रफच्या समस्येवर खूप गुणकारी ठरतो.

– आले देखील कोंड्याची समस्या दूर करण्यात मदत करते. यासाठी प्रथम आल्याची पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये पाणी घाला आणि चांगले मिक्स करा. नंतर पाणी गाळा आणि वेगळे करा. आता या पाण्यात तीळाचे तेल घाला. हे मिश्रण आपल्या केसांच्या मुळांवर व्यवस्थित लावा. आठवड्यातून किमान दोनदा हा उपाय करा. यामुळे केसांतील कोंड्याबरोबर डोक्यातील खाज येण्याची समस्या देखील दूर होईल (Home Remedies for dandruff problem).

– दही केसांना पोषण देते आणि केसांतील कोंडाच्या समस्येपासून मुक्तता मिळते. यासाठी आंबट दह्यामध्ये एक चमचा मिरपूड पावडर मिसळा आणि हे मिश्रण केसांवर सुमारे एक तास ठेवा. यानंतर पाण्याने केस धुवा. आठवड्यातून किमान एकदा तरी हा उपाय करा. यामुळे केस सुधारतील आणि केसातील कोंडाही काही दिवसांत नाहीसा होईल.

– एक कप पाण्यात एक चमचा व्हिनेगर मिसळा आणि केसांच्या मुळांवर लावा आणि एक तासानंतर केस धुवा. यामुळे केसांतील कोंड्याची समस्या देखील दूर होते. जर, अॅपल व्हिनेगर असेल तर ते अधिक चांगले काम करेल.

– लिंबामध्ये असणारे आम्ल घटक रुक्ष केसांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त मानले जातात. तसेच, या उपायात आपल्याला कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त स्काल्पला लिंबाच्या रसाने मसाज करावे. हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करता येतो. यामुळे आपल्याला डँड्रफची समस्येतून आराम मिळेल.

– केसांतील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी कडुनिंबाची पानेही चांगली काम करतात. यासाठी कडूलिंबाची पाने उकळवून घ्या आणि त्याचे पाणी केसांच्या मुळांवर लावा. किमान एक तास असेच सोडा. यानंतर थंड पाण्याने केस धुवा.

(Home Remedies for dandruff problem)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका.
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?.
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका.
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही.
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?.
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा.
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.