AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care | केस गळती, कोंड्याची समस्या? सगळ्यांवर रामबाण उपाय ठरेल बहुगुणकरी ‘रीठा’!

रीठा ही एक औषधी वनस्पती आहे, ज्यात लोहाचे प्रमाण अधिक आहे. लोह आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त घटक आहे.

Hair Care | केस गळती, कोंड्याची समस्या? सगळ्यांवर रामबाण उपाय ठरेल बहुगुणकरी ‘रीठा’!
| Updated on: Dec 24, 2020 | 5:32 PM
Share

मुंबई : केसांची समस्या या आता अगदी सामान्य झाल्या आहेत. आपल्यापैकी बहुतेकांना केसांची कोणतीना कोणती समस्या असतेच. बरेच लोक दररोज गळून पडणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहे. या समस्यांमधून मुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्रिम आप्रले जातात. इतकेच नाही तर अनेक प्रकारची औषधे देखील खाल्ली जातात. परंतु, इतके करूनही या समस्या काही बऱ्या होत नाहीत. यातही असे काही लोक आहेत जे घरगुती उपचारांचा अवलंब करुन काही प्रमाणात त्यांच्या केसांना योग्य पोषण देतात. काही घरगुती उपाय आणि औषधे वापरून आपण आपल्या केसांची काळजी घेऊ शकतो. या सगळ्यात ‘रीठा’ हा केसांच्या सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय आहे (Home remedies with reetha will prevent hair fall).

रीठा ही एक औषधी वनस्पती आहे, ज्यात लोहाचे प्रमाण अधिक आहे. लोह आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त घटक आहे. रीठात असलेले अँटी-ऑक्सिडेंट्स आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. इन्व्हेस्टिगेटिव्ह डर्मेटोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार,  रीठा एक उत्कृष्ट क्लिनिंग एजंट आहे, जो आपल्या केसांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित ठेवतो.

जर आपल्यालाही केसांच्या कुठल्या समस्या असतील तर,रीठा वापरणे फायद्याचे ठरेल. रीठा आपल्या केसांना गळण्यापासून किंवा तुटण्यापासून प्रतिबंधित करते. तसेच, आपल्या केसांच्या वाढीला मदत करते. रीठा नियमित वापरल्याने डोक्यात उवांची समस्या उद्भवणार नाही. याशिवाय रीठा आपले केस काळे, कोमल आणि मऊ बनवते.

चला जाणून घेऊया ‘रीठा’च्या फायद्यांविषयी :

– रीठा तुमचे निर्जीव व कोरडे झालेले केस पुन्हा चमकदार करण्यात मदत करते. रीठायुक्त हेअर पॅक आपल्या केसांचा रुक्षपणा घालवून, गेलेली चमक पुन्हा मिळवून देतो.

– रीठा केसातील कोंड्याच्या समस्येवर देखील चांगला उपाय आहे. केसांतील कोंडा काढून टाकण्यासाठी रीठा पाण्यात भिजत ठेवून, नंतर त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावा. या हेअर पॅकच्या निअय्मित वापरणे कोंड्याची समस्या नाहीशी होईल. आंघोळ करण्यापूर्वी आपण पेस्ट केसांमध्ये लावून नंतर केस धुवू शकता.

– जर आपले केस खूप गळत असतील, तर अंघोळीपूर्वी रीठाच्या पाण्याने केस धुवा. असे केल्याने आपल्या केस गळतीचे प्रमाण कमी होईल (Home remedies with reetha will prevent hair fall).

रीठायुक्त हेअर पॅक बनवण्याची कृती :

रीठा हेअर पॅक बनवण्यासाठी 1 अंडे, 1 चमचा आवळा पावडर, कोरडा रीठा आणि शिकाकाई पावडर एकत्र मिसळून पेस्ट तयार करा. या पेस्टने स्काल्पला मसाज करा आणि अर्धा तास तसेच ठेवा. साधारण अर्धा तासानंतर आपले केस शॅम्पूने धुवा. आठवड्यातून साधारण दोनवेळा ही प्रक्रिया करा. यानंतर आपली केस गळतीची समस्या हळूहळू कमी होत असल्याचे तुम्हाला स्वतः जाणवू लागेल.

(टीप : कुठल्याही उपचारापूर्वी सौंदर्यतज्ज्ञ अथवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

(Home remedies with reetha will prevent hair fall)

हेही वाचा :

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.